कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडू मृत्यू झाला असून बुडालेल्या तरुणाला पोहायला येत नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
सणसवाडी येथे सुनील सायबा जाधव (वय २४ वर्ष) असून उन्हाचा उकाडा होत असल्याने संबधित तरुण पाझर तलावात पोहण्यासाठी गेला होता त्यावेळी त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने व पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
तरुण बुडाल्याची माहिती सणसवाडीचे पोलीस पाटील दत्तात्रय माने यांनी पोलीस स्टेशनला कळवली असता पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे ,पोलीस नाईक राकेश मळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी नेचर गार्ड ऑर्गनायझेशन रेस्क्यू टीमचे गणेश टिळेकर,वैभव निकाळजे,राहूल गायकवाड,राहूल पवळे,आकाश निकाळजे, निखिल काळे,राहूल काटे,सोनाली चव्हाण यांनी मोलाची मदत करत शोध कार्य सुरू ठेवले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक माधुरी झेंडगे यांनी वाघोली येथील अग्निशमन दलास मदतीसाठी पाचारण केले यावेळी एस टी ओ विजय महाजन, ज्ञानेश्वर राठोड, सूरज इंगवले, प्रकाश मदने, विश्वास दराडे, मनोज पवार, लक्ष्मण मिसाळ यांनी शोध करू केले पण ताऱ्यांचा शोध मात्र लागला नाही.