मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
शाब्बास होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमात भरपूर बक्षिसांची रेलचेल
कोरेगाव भीमा – उद्योगनगरी सणसवाडी (ता.शिरूर) येथे मोठ्या प्रमाणात नवरात्र उत्सवाची मोठ्या उत्साहात सूरुवात करण्यात आली आहे.शिरूर हवेली तालुक्याचे आमदार अशोक पवार , माजी सभापती सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाने घटस्थापना , दुर्गादेवीच्या स्थापनेपासून दसऱ्यापर्यंत नऊ दिवस विविध प्रकारच्या नामांकित सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन वतीने करण्यात आले आहे.
घटस्थापने पासून रोज दांडिया, सोनू चा नाद करायचा नाय , शाब्बास होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा , जादूगार ईश्वर , आली लहर केला कहर , ३६ नखरेवाली , स्वर संगम , नथीचा नखरा , धमाका , एकापेक्षा एक अप्सरा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सणसवाडी पंचक्रोशीत या नवरात्र उत्सवाची चर्चा होत आहे.
नऊ दिवस विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांना देवीच्या आरतीचा मान देण्यात येणार आहे. महिलांसाठी होणाऱ्या शाब्बास होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात आकर्षक बक्षीसही ठेवण्यात आले असल्याने महिला भगिनिंमध्ये मोठी उत्सुकता दिसून येत आहे.
सणसवाडी मधील व आसपासच्या गाव मधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहत असून , नागरिकांना जास्तीत जास्त उपस्थित राहण्याच्या आवाहन कार्यक्रमाचे संयोजक जिल्हा नियोजन समितीचे सदस्य , दुर्गामाता नवरात्रोत्सव मंडळ संस्थापक पंडित दरेकर , अध्यक्ष लक्ष्मण दरेकर , उपाध्यक्ष अशोक करडे , आधारस्तंभ रामदास दरेकर , व सणसवाडी ग्रामस्थांनी केले आहे , कार्यक्रम स्थळी , दर दिवस कार्यक्रम शांततेत पार पाडवा यासाठी व्यवस्थित नियोजन करण्यात आले आहे. महिला व पुरुष वर्ग तसेच मुलांसाठी स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे , सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले आहेत , सांस्कृतिक कार्यक्रमासाठी स्वतंत्र व्यासपीठ , उत्कृष्ट साऊंड व लायटिंग व्यवस्था करण्यात आली आहे.