कोरेगाव भीमा – सणसवाडी (ता.शिरूर) ग्राम पंचायतीच्या वतीने महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी समाज कार्यामध्ये अग्रेसर असणाऱ्या महिलांचा सन्मान चिन्ह आणि साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. नवज्योत आगे सरांनी महिलांना व्यवसायाविषयी मार्गदर्शन केले.
स्त्री जन्माचे स्वागत म्हणून सणसवाडी ग्राम पंचायतच्या वतिने २०२२- २०२३ मध्ये जन्मलेल्या मुलींची सुकन्या समृद्धी योजनेत खाते बनवण्यात आले महिलांसाठी संगीत खुर्चीचा कार्यक्रम – ग्रामसंघाच्या महिलांनी गित सादर. डेसे. केले. सुत्रसंचालन ग्राम पंचायत सदस्या सुवर्णा रामदास दरेकर यांनी केले.
यावेळी सामाजिक क्षेत्रातील महिला ग्राम संघाच्या मीनाक्षी कैलास हरगुडे, नयना हरगुडे, प्रियांका कानडे, सुरेखा दरेकर, आशा भांगे, मनीषा घोडके यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सभापती मोनिका हरगुडे,सरपंच संगीता नवनाथ हरगुडे, माजी सरपंच व ग्राम पंचायत सदस्या सुनंदा नवनाथ दरेकर ,स्नेहल राजेश भुजबळ, शशिकला सातपुते,सुवर्णा दरेकर,रूपाली दरेकर, ललिता दरेकर,दिपाली हरगुडे, तंटामुक्ती अध्यक्षा अलका दरेकर,माजी ग्राम पंचायत सदस्या कुंदा हरगुडे,शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या तनुजा दरेकर उपस्थित होते.