भारतीय जैन संघटनेचे कला,विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय वाघोली स्पर्धा परीक्षा विभाग यांच्या माध्यमातून मार्गदर्शन
वाघोली (ता.हवेली) येथील भारतीय जैन संघटनेच्या कला , विज्ञान वाणिज्य महाविद्यालयामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी एक दिवसीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग कार्यशाळा घेण्यात आली या मार्गदर्शन कार्यशाळेमध्ये. आंध्र प्रदेश येथे सेवेस असणारे जिल्हाधिकारी स्वप्निल पवार व पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नरवडे, एसटीआय गौरी शिवले व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रवीण बुगे यांची व्याख्याने या कार्यशाळे दरम्यान झाली.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवून महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षांची तयारी कशी असावी, सातत्य, नियोजन, सराव पूर्ण अभ्यास केला तर आपण निश्चितच यशस्वी होऊ शकतो असे मत जिल्हाधिकारी स्वप्निल पवार यांनी व्यक्त केले. उद्घाटन समारंभ प्रसंगी भारतीय जैन संघटना प्रकल्प व्यवस्थापन प्रमुख सुरेश साळुंके यांनी स्वागत अध्यक्ष पद स्वीकारले. विद्यार्थ्यांची मानसिकता, अधिकारी होण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न, सतत उद्योगी राहणे यावर आपले मत व्यक्त केले.
एकनाथ नरवडे यांनी महाविद्यालय शिक्षणातील आपले अनुभव व स्पर्धा परीक्षा मधील विद्यार्थ्यांचा सराव, ध्येय पूर्ण करण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न व सातत्यपूर्ण अभ्यास हे सूत्र विचारात घेऊन विद्यार्थ्यांनी वर्तन ठेवावे असे मत कार्यशाळे दरम्यान त्यांनी मांडले. कार्यशाळेच्या तृतीय सत्रात एसटीआय मा.गौरी शिवले यांनी स्पर्धा परीक्षा मधील संधी, सुविधा, महिला वर्गाची स्थिती, महाविद्यालय व इतर सुविधा यांचा उपयोग करून आपण अभ्यासाचे नियोजन केले तर अशक्य गोष्टही साध्य होते असे मत मांडले.
कार्यशाळेच्या चौथ्या सत्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रवीण बूगे यांनी प्रत्यक्ष अभ्यासक्रम, सकारात्मक दृष्टिकोन, नियोजन, स्पर्धा परीक्षांचे बदलते धोरण, स्पर्धा परीक्षा आणि विद्यार्थ्यांची मानसिकता या विषयांना अनुसरून महाविद्यालयीन तरुण वर्ग स्पर्धा परीक्षेमध्ये कशा पद्धतीने यशस्वी होऊ शकतो याचा आढावा घेतला. सदर कार्यशाळेमध्ये महाविद्यालयातील एकूण २२५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली.
कार्यशाळेचे संपूर्ण नियोजन स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक डॉ. सचिन कांबळे, प्रा. प्रदीप आव्हाड, प्रा. प्रबोधिनी वाखारे, डॉ. शिवाजी सोनवणे यांनी केले. कार्यशाळेमध्ये डॉ. एस.व्ही. गायकवाड , डॉ.भूषण फडतरे, डॉ. सहदेव चव्हाण, डॉ. विपुल घेमुड, प्रा. निखिल आगळे, श्री गिरीश शहा, नवनाथ बटुळे यांनी प्रत्यक्षपणे ही कार्यशाळा यशस्वी करण्यामध्ये सहकार्य केले.