विद्रोही कृती समिती,नाशिक यांच्या वतीने बलिप्रतिपदेच्या दिवशी करण्यात आलेल्या ‘बळीराजा गौरव दिन’ महोत्सवात पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेड या संघटनेचे शहराध्यक्ष सतीश काळे यांचा ‘विद्रोहीरत्न’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच विचारवंत उपस्थित होते.
नाशिकच्या विद्रोही कृती समितीच्या वतीने दर वर्षी बलिप्रतिपदेनिमित्त बळीराजाला अभिवादन करण्यासाठी ‘बळीराजा गौरव दिन’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी नशिक मधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या निमित्ताने बळीराजाची भव्य रांगोळी काढण्यात आली. तसेच ‘बळीराजाचा इतिहास आणि आज’ या विषयावर परिवर्तनवादी साहित्यिकांनी आपले विचार मांडले. यानंतर महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात सामाजिक चळवळीत उल्लेखनिय कामगिरी केल्याबद्दल पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेड या संघटनेचे शहराध्यक्ष सतीश काळे यांचा ‘विद्रोहीरत्न’ हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
विद्रोहीरत्न’ पुरस्काराने मी भारावून गेलो. आपल्या कार्याचं कुणीतरी मुल्यांकन करतंय हे पाहून आनंद वाटला. या पुरस्कारासाठी निवड म्हणजे एक सोनेरी क्षणच आहे. याबद्दल आयोजक समितीचे आभार मानतो. – सतीश काळे ,शहराध्यक्ष, पिंपरी चिंचवड संभाजी ब्रिगेड संघटना