सणसवाडी सहा येथे गुंठ्यांत साकारतेय स्वामी समर्थ मंदिर, महिला भगिनिंचा उत्स्फूर्त सहभाग, नऊ दिवस विविध याग,
कोरेगाव भिमा – सणसवाडी (ता.शिरूर) येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग शाखा – सणसवाडी (दिंडोरी प्रणीत) येथे श्री दत्त जयंती निमित्त श्री गुरुचरित्र पारायण व अखंड प्रहर-नाम-जप-यज्ञ सोहळ्याचे भव्य दिव्य आजोजन करण्यात आले असून पाचशे सत्तावन्न सेवेकरी गुरुचरित्राच्या पारायणाला ब
सले असून महिला भगीनिंची उपस्थिती लक्षणीय असून अबालवृद्ध या सोहळ्यात मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले असून विशेष येथे सद्गुरू सेवेकरी अहोरात्र काम करत आहेत.
सदर धार्मिक सोहळ्याचे नियोजन माजी सरपंच सुरेश हरगुडे, समर्थ ज्वेलर्सचे अशोक ढेकळे, अरुण हिरे, रंजीत घाडगे, दीपक पानसरे, अविनाश घुगे व इतर स्वामी समर्थ सेवेकरी करत आहेत.
बूधवार दि. २० डिसेंबर ते २७ डिसेंबर असा सात दिवसांचा श्री गुरुचरित्र पारायण व अखंड प्रहर-नाम-जप-यज्ञ सोहळा संपन्न होत असून या सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या सेवकरींना गुरुचरित्र अध्यात्म केंद्राकडून देण्यात ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथे सप्ताह काळात अखंड चोवीस तास नामजप व विणा पहारा करण्यात येणार आहे.सकाळी आठ ते रात्री आठ महिला भगिनी विणा पहारा तर रात्री आठ ते सकाळी आठ असा पुरुष सेवेकरी विणा पहारा व अखंड सद्गुरू नामस्मरण जप व धार्मिक विधी करण्यात येणार आहे.