शिरूर तालुक्यातील पश्चिम भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेल्या श्री व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लि., जातेगाव, यांनी अल्पावधीतच आपले नावारूप सिद्ध केले आहे. सन्माननीय संचालक मंडळ आणि सभासदांच्या आर्थिक प्रयत्नांमुळे कारखान्याने यशाच्या नवनवीन उंचीवर पोहोचण्याचा गौरव प्राप्त केला आहे.
या उत्कृष्ट कार्यामुळे विस्मा संस्थेचा “उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन” पुरस्कार कारखान्याला प्रदान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यात कारखान्याचे चेअरमन संदीप तौर , जनरल मॅनेजर भानुदास सायकर , आणि असिस्टंट जनरल मॅनेजर विवेक सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीने या पुरस्काराचा मान वाढवण्यात आला.
श्री व्यंकटेशकृपा शुगर मिल्स ने कमी जागेत युनिटची उभारणी, भरघोस गाळप, आणि योग्य टिमवर्कच्या माध्यमातून जलद निर्णयक्षमता या सारख्या अनेक पैलूंमध्ये आपली यशस्वी वाटचाल दर्शवली आहे. चेअरमन संदीप तौर यांच्या नेतृत्वाखालील अचूक नियोजन आणि योग्य मार्गदर्शनामुळे कारखाना नवनवीन व्हिजन घेऊन पुढे जात आहे.
या कारखान्याच्या स्थापनेपासून ऊस उत्पादक शेतकरी, शेअरधारक, कामगार वर्ग, आणि सन्माननीय संचालक मंडळ यांच्या सहकार्यामुळे आणि चेअरमन संदीप तौर यांच्या सिंहाच्या वाट्यामुळे हा कारखाना यशस्वीपणे प्रगती करत आहे. या पुरस्काराने सर्व स्तरातून चेअरमन संदीप तौर , संचालक मंडळ, शेतकरी, आणि कारखानाच्या हितासाठी हातभार लावणाऱ्या सर्वांचे ऋण व्यक्त केले जात आहे.