ग्रामीण भागातील अनाधिकृत प्लॉट विक्रीला ऐन दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावर मोठा फटका…
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील ग्राम सभेने अनाधिकृत प्लॉटींग विरोधात बंदी करण्याचा एकमुखाने ठराव घेण्यात आला असून वढू बुद्रुक येथे अनाधिकृत प्लॉट विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून आता ग्राम सभेनेच ठरावाने बंदी घातली असून या ठरावाने ग्रामीण भागात वाढलेल्या अनाधिकृत प्लॉट विक्री करण्यास चांगलाच आळा बसणार आहे.याबाबत १८० नागरिकांनी आर्ज केला होता.
श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील ग्रामसभा सरपंच सारिका अंकुश शिवले ,उपसरपंच राहुल ओव्हाळ, ग्राम पंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थित मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडली यावेळी सन २०२४ -२५ वर्षाचे अंदाज पत्रकमंजुरी, लेबर बजेट, आवास योजना लाभार्थी निवड, सहामाही जमा खर्च,१५ वा वित्त आयोग व सभेच्या ऐनवेळी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नावर खेळीमेळीच्या वातावरणात चर्च अहौन निर्णय घेण्यात आले. यामध्ये श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथे अनाधिकृत प्लॉटिंग वर बंदी घालण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आल्याने प्लॉटिंग करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी विक्री वेग घेत असते यामध्ये गरिबांना परवडणारी गुंठेवारी हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढत असून यामध्ये एकत्रित आकरा जणांचे खरेदी खत करण्याचे प्रकार वाढत आहे पण मूलभूत सोयीसुविधा यावर भर देण्यापेक्षा या गावापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर, बाजाराची सोय , हे क्षेत्र जवळ ते पर्यटन केंद्र जवळ, शहराच्या लगत अशा जाहिरात बाजीवर भर देण्यात येते व दिशाभूल होऊ नये यासाठी श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील ग्रामस्थांनी अनधिकृत प्लॉटिंग विरोधात ठराव केला असल्याची माहिती देण्यात आली.
सर्वसामान्य लोकांनी गुंठा खरेदी करताना कलेक्टर येणे, रहिवासी झोन, पि एम आर डी ए मंजुरी तसेच स्वतंत्र गुंठयांचे खरेदीखत, सातबारा नोंद करून देण्याची खात्री असल्याशिवाय खरेदी विक्री करू नये व पै – पै करून साठवलेले पैसे चुकीच्या ठिकाणी गुंतवू नये व सामान्य नागरिकांची दिशाभूल होऊ नये व त्यांच्या घराच्या स्वप्नांशी कोणी खेळू नये यासाठी व श्री क्षेत्र वढु बुद्रुक ग्रामस्थांनी प्लॉटिंग विरोधात ठराव घेतला आहे.
शासनाने घालून दिलेल्या गुंठेवारी बाबत नियमांचे काटेकोर पालन करत कलेक्टर येणे, पि एम आर डी ए मंजुरी,रहिवासी झोन दाखला, मूलभूत सोयी सुविधा वीज, रस्ता, ड्रेनेज लाईन व इतर अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून शासकीय नियमांचे पालन करत नसतील व कुठल्याच सक्षम प्राधिकरणाची , जिल्हाधिकारी कार्यालय, पि एम आर डी ए विभागाची मंजुरी नसणाऱ्या अनधिकृत प्लॉट विक्रीला ग्राम पंचायत ठरावाने बंदी घालण्यात आली असून याबाबत जिल्हाधिकारी व तहसील कार्यालय यांच्याशी पुढील पत्रव्यवहार करत योग्य टी कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच सारिका अंकुश शिवले व ग्रामसेवक शंकर भाकरे यांनी दिली.