साहेब कोयत्याच करायचं काय ??
नितीन करडे
पुणे जिल्ह्यात कोयात्याच्या गुन्हेगारी वापराणे सामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून आता ग्रामीण भागातही कोयत्याचे लोण पसरते की काय ?? साहेब या कोयत्याचे करायचे तरी काय असा प्रश्न निर्माण होत असून हवेली तालुक्यातील तिर्थक्षेत्र थेऊर येथील मुळा मुठा नदीच्या पुलावर टेम्पोला साईट न दिल्या कारणांमुळे टेम्पो चालकाने एका दुचाकी स्वराला टेम्पो आडवा लाऊन भरदिवसा कोयत्याने मारहाण केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.
टाटा कंपनीचा टेम्पो (एम एच १४ जी डी ३१०५) हा भाजी पाला (पालक) काढणीसाठी चालला असल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे.दुचाकीस्वाराबरोबर साईट देण्यावरून वाद उद्भवला आणि रागाच्या भरात त्या टेम्पो चालकाने कोयत्याचे आठ ते दहा घाव दुचाकी स्वरावर घातले पण सुदैवाने दुचाकीस्वार बचावला.यात दुचाकी स्वार जखमी झाला आहे. ही घटना दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास थेऊर येथील नदीच्या पुलावर घडली असून यावेळी परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मारहाण चालू असताना महिला व पुरुषानी टेम्पो चालकाला थांबण्याचा प्रयत्न केला पण टेम्पो चालकाने कोणालाही न जुमानता दुचाकी स्वराला कोयत्याने मारतच राहीला होता.यावेळी दुचाकीस्वाराला डोक्याला जखम झाली आहे.
बकोरी येथील ग्रामस्थांनी सांगितले की हा टेम्पो चालक थेऊर पासून कोणालाच पुढे जाऊ देत नव्हता. जवळच थेऊर तिर्थक्षेत्र असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या पर्यटकांना मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तसेच नदीच्या पुलावर बघ्यांची गर्दी जमली होती.व त्यातील एका नागरिकांनी 112 नंबरवर फोन करून पोलीसांना माहिती दिली.घटनेची माहीती मिळताच थेऊर पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके घटनास्थळी दाखल झाले.पुढील कारवाई व तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.
परिसरात भीतीचे वातावरण –थेऊर येथील धक्कादायक घटना टेम्पोला साईट न दिल्या कारणावरून टेम्पो चालकाने दुचाकीस्वाराला भरदिवसा कोयत्याने आठ ते दहा घातले घाव , परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.