श्रीमंतयोगी वाद्य पथक हे सामाजिक जाण व भान जपणारे संवेदनशील कुटुंब – सागर गव्हाणे
कोरेगाव भीमा – दिनांक १८ डिसेंबर
पेरणे फाटा (ता.हवेली) ग्रामीण भागातील मुलांना ढोल ताशा वाद्य पथकाच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यासह विविध भागात ज्यांचा निनाद व दमदार आवाज घुमतो अशा नामांकित श्रीमंत योगी वाद्य पथकातील वादकांचा सन्मान व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला यावेळी वाद्य पथकातील पालक व परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
पेरणे फाटा (ता.हवेली) येथे संस्कृती हॉटेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन, छञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व ढोल ताशा यांचे पूजन महेश कुलकर्णी , अरुण वाडेकर, सुभाष पिंपळे ,उमेश गव्हाणे, संपत ढेरंगे, गणपत ढेरंगे, सचिन टाकळकर, सोमनाथ मांझिरे,ज्ञानेश्वर मांजरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी श्रीमंत योगी वाद्य पथकाच्या वतीने सन २०२३ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सन २०१६ वर्षापासून अत्यंत बिकट , खडतर परिस्थितीतून वाद्य पथकाची वाटचाल करत सामाजिक बांधिलकी जपत यशस्वी ७ व्या वर्षात पदार्पण करण्यात आल्याने यावेळी मोठ्या प्रमाणात वाद्य पथकाचे वादक व पालक उपस्थित होते. वाद्य पथकाचे नवनिर्वाचित अध्यक्ष म्हणून भानुदास ढेरंगे व उपाध्यक्ष प्रसाद देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी समजसाठी अहोरात्र काम करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पत्रकार सुनील भांडवलकर,उदयकांत ब्राम्हणे,यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सागर गव्हाणे, संग्राम ढेरंगे,भानुदास ढेरंगे,युवराज ढेरंगे,अविनाश गव्हाणे, कालिदास शिंगाडे, प्रसाद देशमुख , शुभम दौंडकर, भूषण भारंबे, अनिकेत परदेशी,शुभम परदेशी,अमित सिंग,योगेश ढगे,श्रीरंग काळभोर,आदेश चव्हाण,स्वप्निल गव्हाणे, उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांतीलाल भोसुरे यांनी तर आभार प्रदर्शन शुभम परदेशी यांनी केले.