कोरेगाव भीमा – श्रीक्षेत्र वढू बुद्रुक ता शिरूर येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी शिलावती धनंजय भंडारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे सरपंच अंजली प्रफुल्ल शिवले यांनी सांगितले.
श्री क्षेत्र वढू बुद्रुक येथील ग्राम पंचायतीच्या उपसरपंच पदाचा राहुल कुंभार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त जागेची निवडणूक सरपंच अंजली प्रफुल्ल शिवले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी उपसरपंच पदासाठी शेवटच्या क्षणापर्यंत एकमेव अर्ज शिलावती धनंजय भंडारे यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे सरपंच अंजली प्रफुल्ल शिवले यांनी जाहीर केले याकामी त्यांना ग्राम विकास अधिकारी शंकर भाकरे यांनी मदत केली.
यावेळी माजी सरपंच सारिका अंकुश शिवले, माजी सरपंच प्रफुल्ल शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले, माजी सरपंच अनिल शिवले, माजी चेअरमन राजाराम आहेर, माजी उपसरपंच हिरालाल तांबे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भंडारे , कृष्णा आरगडे , वैभव भंडारे , रेखा शिवले, संगीता सावंत, रोहिणी भंडारे,अनिता भंडारे ,भाऊसाहेब मारूती, शिवले,खंडू भंडारे, ज्ञानेश्वर भंडारे , मनोहर भंडारे व ग्रामस्थ उपस्थित होते.