शिरूर पोलीसांचे दंगल काबु करण्यासाठी शिरुर बसस्थानक परीसरात मॉक ड्रिल
दंगल सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी शिरूर पोलिसांची रंगीत तालीम
शिरुर शहरात दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास ही परिस्थिती हातळण्याबाबत पोलीस यंत्रणाची व अन्य यंत्रणाच्या सतर्कतेच्या संदर्भातील रंगीत तालीम शिरूर बसस्थानकासमोर करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक संजय जगताप , पोलिस निरीक्षक अभिजीत पवार, पो. हवालदार अरुण उबाळे, उमेश भगत, पो.नाईक नाथा जगताप, बापू मांगडे,विशाल कोथळकर,तुकाराम गोरे,निलेश शिंदे, अशोक शिंदे,प्रताप टेंगले, विनोद मोरे, पो.कॉ. सुरेश नागलोत, विशाल पालवे, बंडू कोठे, भागवत गरकळ, प्रविण पिठले, शेखर झाडबुके, राजू मांगडे, अर्जन भालसिंग, महीला पोलीस अंमलदार तृप्ति माकर, प्रतिभा देशमुख, यांच्यासह गृहरक्षकदलाचे जवान आदीनी सहभाग घेतला. दोन रुग्णवाहिकासह, आग विझविण्याचा बंब,आदी यात सहभागी झाले होते. त्याखेरीज ठिकठिकाणी चेकपोस्ट नाके करुन तिथे पोलीस तैनात करण्यात आले होते.
दंगल झालेल्या ठिकाणी पोलीसांचे आगमन, रुग्णवाहिका अग्निशामक दलाचे दाखल होणे, जखमींना रुग्णालयात दाखल करणे, दंगेखोराना पकडुन पोलीस व्हॅन मधुन पोलीस स्टेशनला रवाना करणे ,जमावाला काबूत आणण्यासाठी अश्रूधूरचा वापर याबाबतच्या तयारीची रंगीत तालीम यावेळी करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी सांगितले की, अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू कोणीही बेकायदेशीर जमाव अमा करुन भांडण तंटा केल्यास योग्य ती कायदेशीर कडक कारवाई केली जाईल. कोरेगाव भिमा विजयस्तंभाच्या अनुषंगाने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. व कायदा हातात घेवू नये. शासकिय यंत्रणा यांच्यातील समन्वयातील तयारीची रंगीत तालीम आजच्या डेमोद्ववारे करण्यात आली.