Thursday, November 21, 2024
Homeक्राइमशिरूर तालुक्यात साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

शिरूर तालुक्यात साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

मुखई (ता. शिरूर) येथे दुचाकीत साडीचा पदर अडकून पडल्याचे महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रेणुका बाबुराव वोइंदे (वय २८, रा. धामारी, ता. शिरुर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

या घटनेमुळे मृत महिलेच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. धामारी येथील पाबळ-शिक्रापूर रस्त्याने बाबुराव वोइंदे व रेणुका वोइंदे हे दोघे त्यांच्या दुचाकीहून चालले होते. मुखई गावातील मुक्ताई मंदिराजवळ आल्यानंतर रेणुका यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या चाकात अडकून गुंढाळला गेल्याने रेणुका या जोरात रस्त्यावर पडल्या. अपघातात त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्यामुळे त्यांना तत्काळ उपचारासाठी शिक्रापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, डॉक्टरांनी त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.दरम्यान, हनुमान पवार यांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!