Thursday, November 21, 2024
Homeइतरशिरूर तालुक्यात बिबट्याने भिंत उकरून केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू

शिरूर तालुक्यात बिबट्याने भिंत उकरून केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू

टाकळी हाजी (ता.शिरूर) येथे पोल्ट्रीच्या शेडमध्ये बांधलेल्या शेळ्यांना पाहून बिबट्याने भिंत उकरून आत प्रवेश केला आणि हल्ला केला. यामध्ये दोन शेळ्यांचा मृत्यू झाला.

टाकळी हाजी (ता.शिरूर) येथे मंगळवारी (दि. १४) रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.शेतकरी रामदास कारभारी घोडे यांनी घराजवळच बांधलेल्या पोल्ट्रीचे शेडमध्ये कोंबड्या नसल्याने त्यांनी तेथे शेळ्या बांधलेल्या होत्या.शेडच्या खालच्या बाजूस दोन फुटांचे विटांचे बांधकाम केले असून, त्यावर तारेची जाळी लावलेली आहे. मंगळवारी रात्री शेडमध्ये शिकार दिसल्याने बिबट्याने विटांचे बांधकाम उकरून आत प्रवेश करत शेळ्यांवर हल्ला केला.

नेमकी यावेळी तेथेच झोपलेले कामगारास जाग आली व त्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने पळ काढला. मात्र, या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू झाला. वन विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. वन विभागाने पशुधनावरील हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच हल्ले झालेल्या शेतकर्‍यांना तत्काळ नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी टाकळी हाजीचे माजी सरपंच दामूशेठ घोडे यांनी केली.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!