Saturday, September 7, 2024
Homeताज्या बातम्याशिरूरच्या ग्रामीण भागाचा होतोय उडता पंजाब...नशायुक्त पानांमुळे ग्रामीण भगातील तरुणाई व्यसनाधीन

शिरूरच्या ग्रामीण भागाचा होतोय उडता पंजाब…नशायुक्त पानांमुळे ग्रामीण भगातील तरुणाई व्यसनाधीन

भाऊ तू डिग्री घेत बस… मी पानाला चुना लावून लाखो रुपये कमावतो…

कोरेगाव भिमा (ता.शिरूर) – शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागाचा उडता पंजाब होतोय की काय ? तरुणाईला नशायुक्त पानांचे मोठे व्यसन लागले आहे. या पानांमध्ये केमिकल युक्त पदार्थ टाकत असल्याची शंका असून नशायुक्त पदार्थ मिसळले जातात की काय ? तसेच दिवसाढवळ्या चालणाऱ्या या धंद्यांवर अन्न प्रशासन  विभाग, पोलीस प्रशासन यांच्याकडून तपासणी करण्यात येऊन कठोर कारवाई करण्यात येणार की नाही ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

   शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागातील तरुणाईला पानांचे व्यसन लागले असून या पानांमध्ये केमिकल युक्त धुंद आणणारे व गुंगी चढवणारे पदार्थ मिसळवण्यात येतात की काय ? एक तरुण दिवसाला वीस ते तीस पाने खाऊन तोंड लाल करून परिसरही लालेलाल करत आहे.पण याचे ना अन्न खाद्य विभागाला देणे घेणे, पोलीस प्रशासन तोंड देखली कार्यवाही करते आणि पुन्हा तेच पान टपऱ्यांचे धंदे राजरोसपणे सुरू राहत असल्यामुळे शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागाचा उडता पंजाब होतोय की काय ? असा प्रश्न निर्माण होत असून तरुणाई मात्र व्यसनाधीन होताना दिसत आहे.काही पान वाल्यांनी घरून पाने विकत असल्याची चर्चा असून

मागील काही महिन्यांपूर्वी शिक्रापूर पोलिसांनी पुणे नगर रस्त्यावरील पाणटप्प्यांवर कारवाई करत काही मसाला हस्तगत केला होता अन्य प्रशासन विभागाकडे तो पाठवून त्यात काही आमली पदार्थांचा समावेश आहे का याचा शोध घेतला जाणार होता या प्रकरणी काही पान टपरी चालकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते शिरूर तालुक्यातील तरुणाई व्यसनाच्या आहारी जात आहे पोलीस प्रशासनाने व अन्न प्रशासन विभाग तसेच स्थानिक स्वराज्य संस्था या गंभीर समस्या वरती गंभीरपणे पावले उचलून कठोर कारवाई केली पाहिजे अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

ग्रामीण भागातील एका तरुणाचा दिवसाचा पानांवरील खर्च हजार ते बाराशे रुपये असून पान टपरीवर मिळणारे पान एक तरुण दिवसाला साधारणपणे २० ते ३० पाने खात असून काहीजण ३५ ते ४० पाने खात असल्याची चर्चा असून एका पानाची किंमत अंदाजे ३० रुपये जरी धरली तरी साधारणतः हजार ते बाराशे रुपये एका तरुणांकडून एका दिवसाची पाने खाल्ली जात असून एका टपरीवर साधारणतः दिवसाला १०० ते १५० तरुणांनी ३० ते ४० पाने खाल्यास दिवसाला निव्वळ एक ते दीड लाख रुपये कॅश व फोन पे, गुगल पे वरून मिळत असण्याची शक्यता असून यातील पन्नास टक्के जरी खर्च पकडला तरी दिवसाला पन्नास ते पंच्याहत्तर हजार रुपये शिल्लक राहत असल्याची चर्चा असून यावर प्रशासनाची नजर पडणार की नाही ? यावर आयकर विभाग सखोल चौकशी करून  कधी कारवाई करणार की नाही ? अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे 

भाऊ तू डिग्री घेत बस.. मी चुना लावून लाखो रुपये कमावतो – मुले अत्यंत परिश्रमाने डिग्री घेऊन अहोरात्र कष्ट करून त्यांना लाखोंचे पॅकेज मिळत नाही.पण काहीजण पानाला चुना लावून दिवसाला पन्नास ते पंच्याहत्तर हजार कमवत असतील तर महिन्याला लाखो रुपये कमवत असल्याची चर्चा असून डिग्री घेणाऱ्या तरुणाईला त्यांनी अभ्यास व कष्ट करत कामाच्या अनुभवानंतर लाखोंचे पॅकेज मिळते पण पान टपरी टाकून चुना लावत लाखो रुपये कमावले जात असून ग्रामीण भागातील तरुणाईला भाऊ तू डिग्री घेत बस..मी चुना लावून लाखो रुपये कमावतो अशी परिस्थिती निर्माण होत आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!