कोरेगाव भीमा – बकोरी ( ता.हवेली) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक दिनाचे औचित्य शिक्षकांचा सत्कार माहिती सेवा समितीचे माध्यमातून चंद्रकांत वारघडे यांच्याहस्ते करण्यात आला.या एकी शिक्षकांना शिकवण्या व्यतिरिक्त इतर कामे देऊ नये त्यांच्या ज्ञानाचा व कौशल्याचा विद्यार्थ्यांना लाभ मिळायला हवा असे मत यावेळी वारघडे यांनी व्यक्त केले.
बकोरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही तालुक्यातील एक आगळी वेगळी शाळा आहे. इयत्ता १ली ते ७ वी पर्यंत असलेल्या शाळेमध्ये प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर आहे, अद्ययावत तंत्रज्ञान असल्याने विद्यार्थ्यांना विविध संकल्पना समजुअस मदत होते. शिक्षकांनाही मुलांना शिकवणे सोपे जाते व ते लवकरच समजते तसेच शाळेतील सर्व सोयी – सुविधा उपलब्ध करण्यामध्ये यापूर्वीचे अध्यक्ष राजेश वारघडे व ज्ञानेश्वर वारघडे यांचा खुप मोठा वाटा असल्याचे बाळु वारघडे यांनी सांगितले.शाळेचा परीसर खुप सुंदर स्वच्छ व बोलका आहे, सुंदर झाडे, पाणी पिण्यासाठी फिल्टर प्लॅन्ट ,सुंदर, स्वच्छ किचन यामुळे शाळेला भेट देत पाहण्यासारखी असल्याचे मुख्याध्यापक सुनील गायकवाड यांनी सांगितले.शाळेसाठी मुलांना मोठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत अशी मागणी अध्यक्ष बाळू वारघडे यांनी केली. सर्वं शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आंबवने सर ,श्रीमती रोहोडकर,भोसले, धुमाळ मॅडम, मसलखांब सर , कृष्णा गवळी सर हे शिक्षक उपस्थित होते़