शिक्रापूर (ता.शिरूर) येथील महिला भगिनींनी वट पौर्णिमेच्या दिवशी १०० विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करत पतीला दीर्घायुष्य लाभावे तसेच पुढील पिढीस आरोग्यदायी वातावरण मिळावे यासाठी वृक्ष लागवड व संगोपन अशी पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
जॉन डियर इंडिया व वॉटर ऑर्गनायझेशन ट्रस्ट तसेच ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्रापूर येथील राऊतवाडी मध्ये वटपौर्णिमेनिमित्त महिलांच्या हस्ते काळुबाई मंदिर परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आल. यामध्ये वड, पिंपळ, चिंच, करंज, आवळा, कडुलिंब देशी झाडांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला.
या पर्यावरण पूरक कार्यक्रमासाठी शिक्रापूर ग्राम नगरीचे प्रथम नागरिक आदर्श सरपंच रमेश गडदे , ग्रामसेवक शिवाजी शिंदे, वॉटर ऑर्गनायझेशनचे प्रतिनिधी शरद बनगडे , विभागीय प्रबंधक संतोष चौधरी, उपविभागीय प्रबंधक अंजना बांदल, मनोज जाधव, आकाश सावंत, समीक्षा पिंपळकर, रोहित काळे, सुरज शेगर, धनश्री राणे सर्व व्हिलेज ॲनिमेटर त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य उषा तानाजी राऊत, मोहिनी युवराज मांढरे, शालन अनिल राऊत, त्रिनयन कळमकर, कृष्णा सासवडे, प्रकाश वाबळे सामाजिक कार्यकर्ते सतीश बावधाने लहू बावधाने त्याचबरोबर निसर्ग ग्रामसंघाच्या सर्व महिला प्रतिनिधी त्याचबरोबर परिसरातील सर्व महिला उपस्थित होत्या