शिक्रापूर (ता.शिरूर) येथील कर्तव्य फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष मनीषा रमेशराव गडदे यांनी प्रिन्स्टाइन चारिटी फाउंडेशन पुणे येथील डॉक्टर बडे सर व संपूर्ण टीम यांच्या माध्यमातून सर्व रोगनिदान भव्य शिबिराचे आयोजन केलेले होते. गडदे परिवाराच्या वतीने आदर्श सरपंच रमेश गडदे, सुरेश गडदे, बबनराव गडदे, ऋषिकेश गडदे , संकेत गडदे, लता गडदे, महेश शिर्के व संपूर्ण गडदे परिवाराच्या वतीने डॉक्टर बडे सर व संपूर्ण टीमचे यथोचित स्वागत मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत केले.
जर्मन टेक्नॉलॉजी मशीनद्वारे संपूर्ण शरीराच्या ३८ तपासण्या रिपोर्टद्वारे अचूक रोगनिदान करत आयुर्वेदावर आधारित संपूर्ण चिकित्सा करत तब्बल ३८० नागरिकांनी या भव्य महाआरोग्य रोगनिदान शिबिरामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवत गर्दीचा यावेळी उच्चांक केला. सदर शिबिर सकाळी साडेनऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत चालू होते. प्रचंड उत्स्फूर्त सहभागामुळे तब्बल १०० नागरिकांना या शिबिरात इच्छा असूनही तपासणी करता आली नसल्याचे आयोजकांनी सांगितले.
सदर शिबिराचे अल्प कालावधीत नेटके नियोजन सरपंच रमेश गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली ह्यूमन राइट्स फाउंडेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पुणे जिल्हाध्यक्ष- संतोष , अंकुश घारे यांनी व सहकारी मित्रमंडळींनी केले.
शिबिराचे उद्घाटन दीपप्रज्वलन निमंत्रित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान डॉ. प्रवीण बढे सर यांनी उपस्थित शिबिरार्थींना आयुर्वेदाचे महत्त्व विशद करताना सांगितले की कार्यक्रमाचे नियोजन तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ यांची उपस्थिती व सहकार्य पाहून जनमानसात आपली व ताईंची प्रतिभा व लोकप्रियता दिसून येते. हे सर्व आपल्या व ताईंच्या इमानदारपणा, लोक सेवेची आवड, कर्तव्यदक्षता, समाजाबद्दल आपुलकी व प्रेम याची पोचपावती आहे.
आपण दोघेही सदैव जन माणसाच्या कल्याणा करता प्रयत्नशील राहाल ही अपेक्षा नाही तर खात्री आहे.अशा प्रकारचे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करून आपण समाजा बद्दलची बांधिलकी व त्यांच्या आरोग्याबद्दलची काळजी व तळमळ दिसून येते. आपल्यासारख्या युवा व कर्तबगार प्रत्येक सरपंचांनी सामाजिक बांधिलकीची धुरा हाती घेतली तर समाज विकसित व आरोग्यदायी होण्यास खूप मोठी मदत होईल अशी भावना बडे सरांनी व्यक्त केली.
माजी जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, माजी जिल्हा परिषद सदस्य कुसुम मांढरे, शिरूर तालुका शिवसेना अध्यक्ष रामभाऊ सासवडे, शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय अधीक्षक अर्चना शेडे, वरिष्ठ कार्यकारी अभियंता नितीन महाजन, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक साळुंखे व सहकारी, शिरूर तालुका आरपीआय गटाचे अध्यक्ष अध्यक्ष नवनाथ कांबळे, शिक्रापूर ग्रामपंचायत उपसरपंच सारिका सासवडे, शिक्रापूर ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, प्रका वाबळे,कृष्णा सासवडे, उषा राऊत, शालन राऊत.,तालुका भाजपा उद्योग आघाडी अध्यक्ष राजा मांढरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
माजी उपसरपंच नवनाथ सासवडे, भूमाता ब्रिगेड शिरूर तालुका अध्यक्ष मंगल सासवडे, शिवसेना महिला आघाडी शिरूर तालुका अध्यक्ष चेतना ढमढेरे, जीवनज्योत सामाजिक संस्था अध्यक्ष ज्योती पाटील, सिमाई फाउंडेशन अध्यक्ष सीमा पवार,
महागणपती मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटी शाखा व्यवस्थापक तुषार खंदारे आदी प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते सर्वांनी सदिच्छा व शुभेच्छा व्यक्त केल्या.सतीश सासवडे, अण्णा हिंगे, ज्ञानेश्वर राऊत, प्रशांत वाबळे,स्वप्निल मांढरे, हार्दिक गडदे,विविध ग्राम संघाचे पदाधिकारी ,जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र पदाधिकारी, बारा बलुतेदार संघटना सर्व पदाधिकारी, शिक्रापूर समस्या व उपाय ग्रुप सर्व पदाधिकारी, शिक्रापूर आरोग्य उपकेंद्राच्या सर्व आशा सेविका,प्रहार संघटना शिरूर तालुका शिक्रापूर शाखा दिव्यांग बांधव पदाधिकारी,पाटबंधारे विभाग शिक्रापूर खंडेराव तनपुरे, संजय भुजबळ, बाबासाहेब कोळपकर, निवृत्ती काळोखे, माजी सरपंच सचिन सांबारे, अंकुश इचके, लक्ष्मण सांबारे,सूर्यकांत शिर्के सर, ठाकूर सर, शिवाजी मचे, मोहम्मद तांबोळी, सिकंदर शेख ,राहुल राजगुरू ,विलास पवार, थिटे, कळमकर, पंचक्रोशीतील विविध पदाधिकारी ग्रामस्थ महिला वर्ग मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते.
मान्यवरांचे स्वागत आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपाल संतोष दशरथ काळे पाटील यांनी केले. कर्तव्य फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य, शिक्षण ,विद्यार्थी , महिला व खेळाडू यांच्यासाठी विशेष काम करणार असल्याचे कर्तव्य फाउंडेशनच्या अध्यक्षा मनीषा रमेश गडदे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.