ज्येष्ठ नागरिक संघाच्या आरोग्य शिबीर १४० रुंगणांची आरोग्य तपासणी
कोरेगाव भीमा – शिक्रापूर (ता.शिरूर) येथील ज्येष्ठ नागरिक संघ, शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत व शिक्रापूर ग्रामस्थांच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिना निमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले .
सदर आरोग्य शिबिरासाठी शिक्रापूर ग्रामीण आरोग्य केंद्र शिक्रापूर व एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय महंमदवाडी हडपसर पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉक्टर सय्यद यांनी डोळ्याच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले. राज्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागात डोळ्याची साथ चालू आहे यासाठी आपण सर्वांनी डोळ्याची काळजी घेणे गरजेचे असून मार्गदर्शन केले. ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी भवर सर यांनी एच बी सीबीसी ईसीजी याविषयी मार्गदर्शन केले. शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश गडदे यांनी ज्येष्ठ नागरिकांनी केलेला कार्यक्र कौतुकास्पद असल्याचे सांगत आरोग्याविषयी जागृत राहण्याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रीकांत ढमढेरे ,उपाध्यक्ष बाळासाहेब शेंडे खजिनदार अर्जुन भाऊ शिर्के कार्याध्यक्ष विठ्ठल सासवडे, सचिव अशोक कुदळे, सहसचिव मुसळे सर, संघटक गुलाब सासवडे, दिनकर कळमकर, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, उषा राऊत, पोपट गायकवाड, अंकुश घारे , जेष्ठ नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.