वाबळेवाडीकरांच्या विरोधात १५ ऑगष्ट ग्रामसभेत निषेध ठराव होणार
कोरेगाव भीमा – शिक्रापूर ( ता.शिरूर)
शिरुर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार अॅड.अशोक पवार यांना थेट गावबंदी करण्याचा निर्णय जाहीर करणा-या समस्त वाबळेवाडी ग्रामस्थांचा जाहीर निषेध करुन शिक्रापूरातील सर्व प्रमुख राजकीय पुढारी-पदाधिका-यांनी वाबळेवाडीकरांना थेटपणे इशारा देत सांगितलेकी, आम्ही तुमचा निषेध करतो. तुम्ही अशी कशी गावबंदी करु शकता. तुमची फक्त वाडी आहे आणि शिक्रापूर हे स्वतंत्र गाव असून त्याची एक छोटी वाडी म्हणजे वाबळेवाडी आहे. त्यामुळे तुमचा आम्ही जाहीर निषेध करतो. माजी सरपंच बापूसाहेब जकाते, आबासाहेब करंजे, अरुण करंजे, सोमनाथ भुजबळ तसेच बाबासाहेब सासवडे आदी पदाधिका-यांसह तब्बल ५० शिक्रापूरच्या प्रमुख पदाधिका-यांनी पत्रकार परिषद घेवून वाबळेवाडीकरांच्या निषेधाचा ग्रामसभा ठराव घेण्याचाही निर्णय यावेळी घेतला.
२६ जुलै रोजी वाबळेवाडी शाळा प्रकरण विधानसभेत उपस्थित होताच शुक्रवारी (ता.२८) वाबळेवाडीकरांनी आमदार अशोक पवारांना गावबंदी जाहीर केली. त्यानंतर आमदार पवार रविवारी (ता.३०) वाबळेवाडीतील एका दु:खद परिवाराला भेट दिल्याने पुन्हा हे प्रकरण चिघळले. याच वरुन आज (ता.०३) माजी सरपंच बापूसाहेब जकाते, आबासाहेब करंजे, घोडगंगाचे माजी संचालक अरुण करंजे, समता परिषदेचे राज्य संघटक सोमनाथ भुजबळांसह बाजार समिती संचालक बाबासाहेब सासवडे, उपसरपंच मोहिनी मांढरे, मयुर करंजे, रमेश थोरात, सुभाष खैरे, विशाल खरपुडे, सारीका सासवडे, वंदना भुजबळ, सीमा लांडे, पुजा भुजबळ, कविता टेमगिरे, काका चव्हाण, विठ्ठल सोंडे, बाबा चव्हाण, वाबळेवाडी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य काळूराम वाबळे, माजी सरपंच दिलीप वाबळे, पुणे जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक रमेश भुजबळ, सोसायटी अध्यक्ष अनिल राऊत, बाळासाहेब राऊत, रावसाहेब करंजे आंदींसह गावातील मोठ्या संख्येने पदाधिका-यांनी पत्रकार परिषदेत वाबळेवाडीतील आंदोलकांचा एकमुखी निषेध केला व पुन्हा असा प्रकार कराल तर याद राखा असा इशाराही दिला.
या शिवाय वाबळेवाडी ही शिक्रापूरची एक छोटी वाडी असल्याने त्यांचा ग्रामसभेचा दावा खोटा आहे. शाळा प्रवेशाच्या पावत्यांची खातरजमा आम्ही केलेली असून मर्जीतील लोकांनाच शाळा प्रवेश होत असताना तसेच तत्कालीन मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्या वरील आरोप, त्यांचे निलंबन व पुन्हा नियुक्ती होवून दोन वर्षे उलटूनही त्यावर निर्णय प्रशासन घेत नाही. पालक व विद्यार्थ्यी यांचेवर आंदोलन करण्याचा दबाव शाळेतीलच दोन शिक्षक करीत आहेत. वारे व एकनाथ खैरे या शिक्षकांनी स्वेच्छा निवृत्तीचे अर्ज देऊन राजिनाम्याचे जाहीर केले तरीही आम्ही बोललो नाही. मात्र आमदार पवारांना वैयक्तिक आकसापोटी गावबंदीचा निर्णय जाहीर करणे याचा आम्ही निषेध करतो असे सर्वांनी आवर्जून सांगितले.