पुणे – उरुळी कांचन (ता.हवेली) जवळील शिंदवणे घाटात एका वाहनचालकालाशस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला उरुळी कांचन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.सुदैवाने वाघापूर बाजूने उरुळी कांचनकडे एक ट्रक निघाला होता. या ट्रकचालकाने महाडिक यांना मारहाण करताना पाहिले व ट्रक थांबवला. त्यानंतर सदर पाचही आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले.शुक्रवारी (दि २ फेब्रुवारी) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास लुटमारीच्या घटना घडल्या आहेत.
याप्रकरणी गणेश बाळासाहेब महाडिक (रा. सध्या सासवड मूळ रा. शिंदवणे, ता. हवेली) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अधिकचा तपास करत उरुळी कांचन पोलिसांनी अनिल हनुमंत जाधव (वय २०), प्रवीण अनिल हावगोळ (वय २२ ), विश्वास दयानंद जाधव (वय १९ ), स्वप्निल विनोद देडे (वय १९, रा. चौघेही, विडी घरकुल पवन नगर, सोलापूर), एकनाथ उर्फ रामेश्वर घोडके (वय २१, रा. निवडुंगे, ता. पाथर्डी जि. अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (Pune Crime News)
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन जवळील शिंदवणे घाटातून गणेश महाडिक हे शिंदवणेकडे त्यांच्या दुचाकी वरून निघाले होते. यावेळी रेल्वे पुलाखाली तीन अनोळखी इसमांनी लाईट दाखवून महाडिक यांना अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु महाडिक न थांबता तसेच पुढे निघून गेले. मात्र महाडिक यांच्या मोटारसायकलचा वेग हा शिंदवणे घाटातील वळणावर कमी झाल्यामुळे, दोन अनोळखी इसमांनी हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. पँन्टच्या खिशातील बाराशे रुपये जबरदस्तीने काढून घेतले.
त्याचवेळी घाटातून वाघापूर बाजूने उरुळी कांचनकडे एक ट्रक निघाला होता. या ट्रकचालकाने महाडिक यांना मारहाण करताना पाहिले व ट्रक थांबवला. त्यानंतर सदर पाचही आरोपी त्या ठिकाणावरून पळून गेले. या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात महाडिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.(Uruli kanchan police station))
दरम्यान, सदर घटनेचा तपास उरुळी कांचन पोलीस करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांना या गुन्ह्यातील आरोपी हे उरुळी कांचन परिसरात लपले असल्याची माहिती एका खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी छापा टाकून तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, फरार दोन आरोपींनाही पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुद्देमालांसह ताब्यात घेतले आहे.(गुन्हेवार्ता)
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, उपनिरीक्षक सुधीर पाडुळे, पोलीस हवालदार रणजीत निकम, सोमनाथ सुपेकर, रमेश भोसले, प्रमोद गायकवाड यांच्या पथकाने केली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे करीत आहेत.(pune Crime News)