Thursday, November 21, 2024
Homeताज्या बातम्याशांतीलाल मुथा अनाथांचा देव तो खरा ....बि जे एस आहे आम्हा आसरा...

शांतीलाल मुथा अनाथांचा देव तो खरा ….बि जे एस आहे आम्हा आसरा…

परिस्थितीने गांजलेल्या व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुक्त विद्यापीठ हे ज्ञान गंगोत्री – माजी उपकुलसचिव उत्तम जाधव कोरेगावभीमा – दिनांक ११ डिसेंबर शांतीलाल मुथा अनाथांचा देव तो खरा ….बि जे एस आहे आम्हा आसरा… अशा भावना येथील स्वागत समारंभ प्रसंगी मांडण्यात येऊन भारतीय जैन संघटनेच्या कार्याचा व शांतीलाल मुथा यांच्या मानवतावादी कार्याचा गौरव करण्यात आला. भारतीय जैन संघटना ही सामाजिक उत्तरदायित्व जपणारी, समाजासाठी निस्वार्थ काम करणारी आणि समाजाच्या वेदना व दुःख दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारी संघटना असून या देशावर ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती आली त्यामध्ये गुजरात भूकंप, शेतकऱ्यांची आत्महत्या , कोरोना काळात अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना आधार देण्याचे काम संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल मुथा यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले असल्याचे मत प्रभारी प्राचार्य .डॉ.संजय गायकवाड यांनी व्यक्त केले.

भारतीय जैन संघटना वाघोली (ता.हवेली)येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ प्रसंगी प्रा.डॉ.संजय गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रसंगी बोलताना त्यांनी २०४० आली भारत जा जगाचे नेतृत्व करणार असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वताला तयार केले पाहिजे मानवता व तंत्रज्ञान यांची सांगड घालत . भारताच्या उभारणीत आपले अमूल्य योगदान देत देशाच्या विकासात आपले मोलाची भर घालायला हवी असे प्रतिपादन यावेळी केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मुक्त विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव उत्तम जाधव सरांनी परिस्थितीने गांजलेल्या व शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे व दर्जा मिळवून देणारी ज्ञान गंगोत्री म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे. या विद्यापीठातून अनेक अधिकारी व पदाधिकारी घडले आहेत असे सांगत विद्यार्थ्यांनी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर द्यायला हवा असे अध्यक्षीय मार्गदर्शन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी समंत्रक आवटे मॅडम यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करत संयमी व विद्यार्थ्यांना अनमोल मदत करत असून त्यांच्यामुळे शिक्षण प्रवास सुखकर होत असल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी दिपाली शिंदे,प्रशांत पवळे, अनिता कुंभार,मनीषा गायकवाड,कावेरी काळे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत मुक्त विद्यापीठामुळे आम्हाला शिक्षणाची संधी मिळाली असून उज्वल भविष्याचा वेध घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे असल्याची भावना व्यक केली.यावेळी प्रमुख पाहुणे मुक्त विद्यापीठाचे माजी उपकुलसचिव उत्तम जाधव सर , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गायकवाड सर, इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. भूषण फडतरे,साळुंखे सर, मुक्त विद्यापीठाचे समन्वयक मानवतकर सर, अंधारे सर, पठारे मॅडम, सतीश चौधरी ,शरद ढेपे,अमर खराडे,मनोज पाथर्डे,हेमलता मानवतकर,प्रीती बेरड,राणूबाई तोरडमल व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आवटे मॅडम व प्रा. सुप्रसिद्ध कवी अंधारे सर यांनी आपल्या कविता सादर करत कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले.

बी.जे.एस महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठ येथे एम,एस. डब्लू ,मानसशास्त्र, कौशल्य विकास,एम बी ए,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन , विअड्यार्थ्यांचा सर्वांगीन करण्यासाठी आठही दिवस मार्गदर्शन उपलब्ध राहणार आहे. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालय आपले उत्तरदायित्व पार पाडत असून महाविद्यालयाचे ग्रंथालय सर्वांसाठी खुले आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!