Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्यावेण्णा नदी संवाद यात्रेचा जल पुजनाने समारोप

वेण्णा नदी संवाद यात्रेचा जल पुजनाने समारोप

हेमंत पाटील

सातारा – दिनांक २६ डिसेंबर जनजागृतीपर प्रभात फेरी आणि वेण्णा नदी जलपुजनाने चला जाणुया नदी अभियानांतर्गत वेण्णा नदी संवाद यात्रेचा समारोप करण्यात आला.या प्रसंगी सातारा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक पवार, कृष्णा नदी समन्वय प्रदीप पाटणकर, क्षेत्र माहुलीच्या सरपंच नुतन साळुंखे, श्रीराम हायस्कूलच्या मुख्याध्यापक निर्मला जगदाळे यांच्यासह सिंचन विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थींनी उपस्थित होते.

पृथ्वीवर ३ टक्के पाणी पिण्योग्य आहे. प्रत्येकाने उपलब्ध पाण्याचा काटसरीने वाटप करणे ही आता काळाची गरज आहे तसेच नदी संवाद यात्रेच्या माध्यमातून नद्यांचे प्रदूषण व उपाययोजना करण्याचा शासनाचा मानस आहे. प्रत्येक नागरिकांने आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे त्याचबरोबर नदी, नाले, ओढे, तलाव यांमध्ये कचरा टाकू नये. सिंचन विभागाच्या पाटांमध्ये काही नागरिक कचरा टाकतात, या पाटांमधील पाणी पिण्याबरोबर शेताच्या सिंचनासाठी वापरले जाते. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या पालकांमध्ये कचरा निर्मलनाचे महत्व सांगितले पाहिजे, असे अशोक पवार यांनी यावेळी विचार व्यक्त केले.यावेळी कृष्णा नदी समन्वयक शपाटणकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविंद यादव तर सुत्रसंचालन पुजा देशमुख यांनी केले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!