Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्यादेश-विदेशविमल गव्हाणे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने डिंग्रजवाडी येथे पेढे लाडू भरवत आनंद...

विमल गव्हाणे यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याने डिंग्रजवाडी येथे पेढे लाडू भरवत आनंद साजरा

कोरेगाव भीमा – दिनांक ३ डिसेंबर

‘जागतिक दिव्यांग दिना’चे औचित्य साधून केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने वर्ष २०२१- २२ चा राष्ट्रीय दिव्यांग पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात आयोजित करण्यात आला होता. दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आले.

दिव्यांगांसाठीच्या ‘सुगम्य भारत” अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी केल्याबद्दल पुणे जिल्ह्यातील पेरणे प्राथमिक आरोग्य केंद्र ( ता.हवेली) येथे सेवेवर असणाऱ्या व डिंग्रजवाडी येथील रहिवासी विमल पोपट गव्हाणे यांना राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला हा ऐतिहासिक क्षण अवघ्या डिंग्रजवाडी करांनी टिव्ही, लॅपटॉप व मोबाईलवर पाहत हृदयात साठवला प्रत्येकाच्या मनातील आदर , स्वाभिमान व कृतज्ञता यावेळी एकवटली होती आपल्या गावातील , आपल्या मातीतील कर्तव्यनिष्ठ आरोग्य सेविका यांचा सन्मान पाहणे अभिमानास्पद व गौरवास्पद असल्याची भावना व्यक्त करत डिंग्रजवाडी व पेरणे गावच्या नावासह शिरूर हवेली तालुक्याचे नाव देशात सन्मानाने पोचवत गावचा नावलौकिक वाढवला याबद्दल डिंग्रजवाडी ग्रामस्थांनी एकमेकांना पेढे लाडू भरवत आनंद साजरा केला.

यावेळी डिंग्रजवाडीचे सरपंच यशवंत आबासाहेब गव्हाणे सरपंच ,माजी उपसरपंच दत्तात्रय गव्हाणे , विजय काळूराम गव्हाणे , माजी शालेय समिती अध्यक्ष अजय गव्हाणे, अध्यक्ष शालेय समिती सतीश गव्हाणे, संतोष महादेव गव्हाणे , अविनाश गव्हाणे , तुषार गव्हाणे , कुमार गव्हाणे, ऋषिकेश गव्हाणे , देवदत्त कोतवाल सर, मयूर गव्हाणे किरण गव्हाणे व समस्त ग्रामस्थ डिंग्रजवाडी उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!