कोरेगाव भीमा – शिक्रापूर ( ता.शिरूर) विद्यार्थी ही राष्ट्राची संपत्ती, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे राष्ट्र विकासाची पायाभरणी असून आपण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यायला हवा.विद्यार्थ्यांचा विकास ही सामाजिक जबाबदारी असून त्यांना पोषक, सुदृढ सामाजिक व शैक्षणिक वातावरण यासह वैज्ञानिक दृष्टिकोन , मानवतावादी शिकवणूक देणे आपले कर्तव्य असल्याचे मत शिक्रापूर ग्राम नगरीचे सरपंच रमेश गडदे यांनी व्यक्त केले.
शिक्रापूर केंद्रातील शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा यामध्ये नेत्रदीपक यश मिळवले याबद्दल कोयाळी पुनर्वसन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे सत्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी शिष्यवृत्ती व नवोदय विद्यालय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व मार्गदर्शक शिक्षकांसह मुख्याध्यापक व या विभागाचे केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर सर यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शिक्रापूर ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना ट्रॉफी व स्कूल बॅग देण्यात आल्या व मार्गदर्शक शिक्षकांना तसेच मुख्याध्यापकांना ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.राजेंद्र टिळेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
याप्रसंगी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच विशाल खरपुडे, माजी उपसरपंच सुभाष खैरे, मयूर करंजे, ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ, सारिका सासवडे, मोहिनी युवराज मांढरे , उषा राऊत, वंदना भुजबळ, सीमा लांडे, शालिनी राऊत, ग्रामविकास अधिकारी शिवाजी शिंदे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अविनाश करंजे, राहुल सासवडे, दीपक भुजबळ पालक वर्ग, इतर शिक्षक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूजा भुजबळ यांनी तर सूत्रसंचालन भोरकडे सर, व्यवहारे सर, गायकवाड सर यांनी सूत्रसंचालन केले.