राज्य प्रकल्प संचालकांची वाबळेवाडी शाळेस भेट
याप्रसंगी शिरूर तालुका गट शिक्षणाधिकारी अनिल बाबर, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद पुणे येथील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी दत्तात्रय वाडेकर, पंचायत समिती शिरूरचे विषयतज्ञ देवकाते, श्रीम. गावडे, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरिफा तांबोळी, शिष्यवृत्ती तज्ञ एकनाथ खैरे, सुनिल पलांडे, जयश्री पलांडे, किरण अरगडे, गोरख काळे, प्रतिभा पुंडे, तुषार सिनलकर, दीपक खैरे, पोपट दरंदले, संदीप गिते, विद्या सपकाळ आणि साहित्यिक शिक्षक सचिन बेंडभर उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सुरेखा वाबळे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वाबळे, माजी उपसरपंच भगवान वाबळे, ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच केशव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे, सदस्य प्रकाश वाबळे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.
वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर अनेक शाळांची उभारणी होणे गरजेचे आहे. – कैलास पगारे ,राज्य प्रकल्प संचालक