Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्यावाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग शाळेत फळ व खाऊचे वाटप

वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग शाळेत फळ व खाऊचे वाटप

 कोरेगाव भीमा – डिंग्रजवाडी (ता. शिरूर)येथील सामाजिक कार्यकर्ते व अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुक्याचे संघटक  पर्वतराज नाबगे यांच्या वाढदिवसानिमित्त मतिमंद निवासी विद्यालय पेरणे फाटा या ठिकाणी मुलांना फळे  व बिस्कीट पुडे वाटप करण्यात आले.

     वाढदिवसानिमित्त डीजे नाच गाणे जल्लोष असं सर्व प्रकार पाहायला मिळत असताना डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील प्रगतशील शेतकरी सामाजिक कार्यकर्ते व अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुक्याचे संघटक पर्वतराज नाबगे यांनी सामाजिक बांधिलकी जपत मतिमंद निवासी विद्यालय येथे फळे व खाऊचे वाटप केल्याने समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावरती अभिनंदन होत आहे व आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी ठेवत साजरा करत त्यांनी समाजासमोर कृतीयुक्त आदर्श ठेवला आहे.मतिमंद निवासी विद्यालयाचे 

  यावेळी  हनुमान पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय गव्हाणे ,माजी चेअरमन रामदास  ढेरंगे, डिंग्रजवाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश गव्हाणे , उद्योजक राहुल ढेरंगे ,,भाऊसाहेब गव्हाणे,किशोर वाळके, सचिन चव्हाण, शाळेचे कटयारमल सर उपस्थित होते.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!