केतन जाधव यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद – धीरज घाटे
वाघोली ( ता.हवेली)वाढदिवसावरील अनावश्यक खर्च टाळून केतन जाधव यांनी सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. जाधव यांचे सामाजिक कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरौवदगार भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी काढले. यापुढेही असेच सामाजिक उपक्रम राबवावे असेही ते म्हणाले. वाघोली येथील भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी भाजपचे वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उदघाटनप्रसंगी ते बोलत होते.
वाघोली येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकासमोर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भाजप वाघोली शहर अध्यक्ष केतन जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन शुक्रवार (दि. १५ सप्टेंबर) रोजी करण्यात आले होते. शिबिरामध्ये मोतीबिंदू ऑपरेशन, डोळे तपासणी, चष्मे वाटप व ५० पेक्षा जास्त मोफत शस्त्रक्रिया तसेच महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत हृदय शस्त्रक्रिया, मेंदू विकार शस्त्रक्रिया, कॅन्सर, मणका विकार शस्त्रक्रिया अल्पदरात करण्यात आली. त्याबरोबर रक्तदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता यामध्ये ७३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
वाघोलीसह परिसरातील नागरिकांनी शिबिराला प्रचंड प्रतिसाद दिला. २ हजार ७५० नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला असून २१० लोकांनी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी नोंद केली. जनरल सर्जरीसाठी ८७ नागरिकांनी नोंद केली तर स्त्रीरोग शस्त्रक्रिया २८ महिलांनी नोंद केली. मोफत १ हजार १५० नंबरच्या चष्म्यांचे वाटप करण्यात आले. २ हजार २०० नागरिकांची नेत्र तपासणी करण्यात आली. पिंपरी येथील डी.वाय. पाटील आयुर्वेदिक हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी अनेक रुग्णांची मोफत तपासणी करून मोफत औषधीचे वाटप केले.
आरोग्य सेवक हिरामण तांबे, नवनाथ बोडके, समता फाउंडेशन व प्राथमिक आरोग्य केंद्र वाघोली यांचे मोलाचे सहकार्य लाभले.यावेळी नगरसेवक राहुल भंडारी, हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील, भाजप युवा मोर्चा हवेली तालुकाध्यक्ष अनिल सातव पाटील, भाजप महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, भाजप क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवे, कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विजय हरगुडे, महिला जिल्हा अध्यक्ष भाजप पुनम चौधरी,भाजप हवेली तालुका अध्यक्ष शाम गावडे, शिवसेना नेते राजेन्द्र पायगुडे, सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधवराव, माजी पंचायत समिती सदस्य सुरेश सातव, माजी उपसरपंच मारुती गाडे, नानासाहेब सातव, संग्राम जाधवराव, निवृत्त एसीपी जाणमहंमद पठाण, कृष्णकांत सातव, समिर भाडळे, अनिल जाधवराव, संतोष तांबे, नाना सातव, मुकेश सातव, संदीप वारे, राहुल वराळ, सागर पन्हाळकर, अमजद खान, विद्या पाटील, अश्विनी पांडे, दत्ता झोरे संदीप शिंदे, आप्पा शिंदे, संतोष देशमुख, तुषार सातव, संदीप जाधव, संतोष हरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.