पुणे – पुण्यातील वाघोली पोलीस चौकिसमोर तरुणाने पेटवून घेतल्याचे प्रकरण लोणीकंद पोलिसांना चांगलेच भोवले आहे. लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या बदली नंतर आता लोणीकंद पोलीस ठाण्यातील अशोक घेगडे, कैलास उगडे आणि महेंद्र शिंदे असे निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नावे आहेत.
पुण्यात दोन दिवसांपूर्वी एका तरुणाने पोलीस कारवाई करत नसल्याने पेटवून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत आरोपींवर गुन्हा दखल केला. तसेच लोणीकंद पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली.याप्रकरणी कर्तव्यात कसूर केली म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे.