कोरेगाव भीमा – वढू बुद्रुक (ता.शिरूर) येथील वखारीचा मळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला स्वातंत्र्य दिनानिमित्त इंत व्हील क्लब पुणे प्लॅटिनम या संस्थेमार्फत शाळेसाठी ९५०० रुपयांचे एक ऑफिस कपाट, तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना चित्रकला वह्या, रंगीत खडूचे बॉक्स, वॉटर बॉटल्स व खाऊचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आय डब्ल्यू सी या संस्थेच्या अध्यक्षा स्नेहल चोरडिया यांनी उपस्थित विद्यार्थी व माता पालकांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व विशद केले. तसेच संस्थेच्या सदस्या मनीषा दौंडकर यांनी विद्यार्थ्यांशी चांगल्या सवयीचे महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. संस्थेच्या समुपदेशक सारिका तानवडे यांनी उपस्थित विद्यार्थी व महिला पालकांना *गड टच व बॅड टच याविषयी देखील सखोल माहिती सांगितली.
शाळेला प्राप्त झालेल्या या वस्तू रुपी मदतीमुळे शाळेच्या भौतिक सुविधेत तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत निश्चितच मोलाची भर पडेल असे मत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नामदेव शिवले यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सर्व नियोजन शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष अंकुश शिवले यांनी केले. याप्रसंगी सर्व सदस्य, ग्रामस्थ व पालक उपस्थित होते. शाळेला केलेल्या मदतीबद्दल अर्चना शिवले यांनी आय डब्ल्यू सी पुणे प्लॅटिनम संस्थेच्या मान्यवरांचे ऋण व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेतील शिक्षक प्रदीप ढोकले यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब ठोंबरे यांनी केले.