आरोपींनी कोरेगाव पार्क परिसरात देखिल चंदन चोरीचे गुन्हे केल्याची दिली कबुली
कोरेगाव भीमा – लोणीकंद ( ता.हवेली) पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी सराईत चंदन चोरांना अटक केली असून त्यांचेकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी (दि. ५ जून) रोजी जबरी चोरीच्या दाखल गुन्हयाचा तपास करत असताना तपास पथकातील सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे व पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोना विनायक साळवे, पोना अजित फरांदे, पोना कैलास साळुंके, पोशि साई रोकडे, पोशि पांडुरंग माने, पोशि अमोल ढोणे, पोशि सचिन चव्हाण पोलीस ठाणेस हजर असताना पोलीस शिपाई साई रोकडे यांना गुप्त बातमीदारामार्फत एक सिल्हर रंगाच्या कारमधून (नं एमएच १२ बिके १६३७) संशयित चार ते पाच इसम वाघोली मार्गे अहमदनगरच्या दिशेने जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.
माहिती मिळताच तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी पथकासह लोणीकंद पोलीस स्टेशन समोर अहमदनगर रोडवर सापळा रचून संशयित कार ताब्यात घेतली. कारमध्ये असलेले तीन आरोपी व चंदन चोरीचा माल ताब्यात घेतला. आरोपींकडे अधिक तपास केला आरोपी हे सराईत चंदन चोर असुन त्यांचेवर दरोड्याचा गुन्हा दाखल निष्पन्न झाले. तसेच यापूर्वी कोरेगाव पार्क परिसरात देखिल चंदन चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींना मुद्देमालासह गुन्हयाचे पुढील तपासकामी बडगार्डन पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त शशीकांत बोराटे, सहा. पोलीस आयुक्त किशोर जाधव, लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक (गुन्हे) मारुती पाटील, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक रविंद्र गोडसे, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, पोना विनायक साळवे, अजित फरांदे, कैलास साळुंके, सागर जगताप, स्वप्निल जाधव, पोलीस शिपाई अमोल ढोणे, साई रोकडे, पांडुरंग माने, आशिष लोहार, मल्हारी सपुरे, सचिन चव्हाण यांनी केली आहे.