ॲड मोहम्मद शेख
लोणीकंद (ता.हवेली) येथे थेऊर फाटा वळणाला कोरेगाव भीमा कडे येणाऱ्या बाजूला व रस्त्याच्या मध्यभागी बोरवेलची गाडी पलटी झाल्याने वाहनांच्या दोन किलोमीटर रांगा लागून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
लोणीकंद येथील फाटा येथे बोअरवेलची गाडी पळती झाल्याने सकाळी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.सकाळची वेळ असल्याने कंपनी कामगार, कंपनीच्या गाडी, प्रवासी ,विद्यार्थी यांना मात्र वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. लोणीकंद पोलिसांनी व ग्रामस्थांनी तातडीने क्रेंनच्या साहाय्याने बोअरवेल ची गाडी बाजूला घेतली.पण तोपर्यंत बी जे एस फाटा इथपर्यंत वाहतूक कोंडी तर कोरेगाव भीमाच्या पुलापर्यंत वाहतूक कोंडी झाली होती.