Wednesday, November 20, 2024
Homeस्थानिक वार्तालोकोत्तर व्यक्तिमत्त्वांना जनमानसात स्थान : डॉ. लवांडे

लोकोत्तर व्यक्तिमत्त्वांना जनमानसात स्थान : डॉ. लवांडे

हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कला महाविद्यालयात ध्यासपर्व व्याख्यानमाला

भिगवण प्रतिनिधी

पराभूत मनोवृतीचा पराभव करून विद्यार्थ्यांनी ध्यासपुर्वक ज्ञानप्राप्ती करावी. शिक्षणाद्वारे शोधकवृती आणि शाहाणपणा घ्यायला शिकावे त्याद्वारेच लोकोत्तर व्यक्तिमत्त्वे घडतात आणि अशा व्यक्तिमत्त्वांना जनमानसात स्थान असते असे प्रतिपादन महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाचे अध्यक्ष डॉ. शामराव लवांडे यांनी केले.

येथील कला महाविद्यालयात माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ध्यासपर्व व्याख्यानमालेत श्री लवांडे ‘एकविसावे शतक : सहकार व संघटन’ या विषयावर बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सहकार्य भावना ही केवळ संघटना व संस्थांमध्येच अढळते असे नव्हे तर कुटुंब, मित्र, गावकरी, नातेवाईक यांचे परस्परांशी असलेले परस्परांशी सहकार्य हा सुद्धा सहकारच आहे. सहकार आणि संघटनातून आपण आपला आणि सहकारी घटकांचा विकास करतो ज्यातून देशाचा विकासाचा मार्ग प्रशस्त होत असतो.’

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात ध्यसपर्व व्याख्यानमाला घेण्यात आली तसेच महाविद्यालय आवारात वृक्षारोपन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक पराग जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे, भिगवणचे सरपंच तानाजी वायसे, इंदापूर अर्बन बॅंकेचे संचालक अशोक शिंदे हे होते. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य संपत बंडगर, रणजित भोंगळे, सुनिल वाघ, भिगवणचे माजी उपसरपंच जयदीप जाधव, संजय रायसोनी, श्रीनाथ पतसंस्थेचे चेअरमन खंडेराव गाडे, ग्रामपंचायत सदस्य तुषार क्षिरसागर, जावेद मुलानी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाळुंज यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्र्माचे प्रास्तविक डॉ. प्रशांत चवरे यांनी सूत्रसंचालन प्रा. शाम सातर्ले यांनी केले तर आभार प्रा. पद्माकर गाडेकर यांनी मानले.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!