कोरेगाव भीमा – दिनांक १६ डिसेंबर पेरणे फाटा (ता.शिरूर) येथील गोल्डन पॅलेस कार्यालयात लग्नासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्याचा गंठण चोरट्याने हिसकावून पळ काढला असल्याची धक्कादायक घटना घडली असून ग्रामीण भागात चोरट्यांचा बंदोबस्त केंव्हा होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोणीकंद पोलीस स्टेशन येथे संबधित महिलेने फिर्याद दिली असून त्यानुसार मिळालेली माहिती अशी की , दिनांक १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ०७.१५ वा. सुमारास पेरणे फाटा ( ता.हवेली) येथील गोल्डन मंगल कार्यालयात लग्नकार्यासाठी संबधित महिला पती ,दिर ,जाऊबाई व छोट्या मुलीसह आले होते त्यावेळी चारचाकी गाडी पार्कींग करुन चालत कार्यालयाकडे जात असताना एक अनोळखी इसम याने फिर्यादी महिलेच्या गळयातून सोन्याचे मोठे गंठण जबरदस्तीने हिसकावून (चोरुन) पळ काढला यावेळी संबधित महिलेच्या कडेवर लहान मुलगी होती त्यावेळी फिर्यादी महिलेने आरड – ओरड केली पण काही समजण्या अगोदर चोराणे पळ काढला होता.
संबधित घटनेचा लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किशोर जाधव ,सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव ,पोलीस उप-निरीक्षक रामकृष्ण दळवी पुढील तपास करत आहे.