आझादी का अमृत महोत्सवानिमीत्त रॉयल बुलेट ग्रुप शिवजयंती उस्तव पुणे जिल्हा यांच्या वतीने हिंजवडी ते ताम्हिणी घाट भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीला तरुणांनी आपल्या रॉयल बुलेट गाड्यांसह उत्स्फूर्त उपस्थिती दाखवत अत्यंत संयमी व शिस्तीत रॅली पार पडली.२०० बुलेट गड्यांसह तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे – मुळशी दिनांक ९ ऑगस्ट
हातामध्ये चैतन्याने फडकणारा तिरंगा ध्वज आणि भगवा ध्वज , अंगावरती परिधान केलेला रॉयल बुलेट ग्रुपचा टी – शर्ट , देशभक्तीच्या प्रचंड ऊर्जेने व स्फूर्तीने भारावलेल्या वातावरणात भारत माता की जय … जय भवानी , जय शिवाजी … असा एकच जयघोष करत शेकडो तरुणांनी हिंजवडी आयटी नगरी ते ताम्हणी घाट मुळशी यादरम्यान अनोख्या व दिमाखदार तिरंगा बुलेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहभागी तरुणाईचा उत्साह व शिस्त पाहण्यासारखा होता.शेकडो तरुणांनी एकत्र येवून तिरंगा बुलेट रैलीचे आयोजन करत नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारने ‘ हर घर तिरंगा ‘ उपक्रमाचे आयोजन केले आहे . या मोहिमे अंतर्गत मोठ्याप्रमाणावर कार्यक्रमांचे केंद्र सरकारने आयोजन केले आहे . यात आता तरुण देखील हिरीरीने सहभागी होत आहे . या उपक्रम अंतर्गत रॉयल बुलेट ग्रुप शिवजयंती उस्तव पुणे जिल्हा यांच्या वतीने या भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते
रॉयल बुलेट ग्रुप गेल्या ८ वर्षांपासून भव्य दिव्य बुलेट रॅलीचे आयोजन करत आहे . यावर्षी या रॅली मध्ये जवळपास २०० बुलेट सह तरुण वर्ग स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षांनिमित्त या मोहिमेत अनोख्या पद्धतीने सहभागी झाले होते . यापूर्वी देखील रॉयल बुलेट ग्रुप शिवजयंतीनिमित्त अशीच भव्य रॅली काढण्यात आल्या होत्या. या ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असतात.यामध्ये वृक्षरोपण हा स्तुत्य उपक्रमामध्ये मोलाचे योगदान आहे. या ग्रुप मधील तरुणाई व्यावसायिक,उच्चशिक्षित असून देशप्रेमाने व सामाजिक कार्याने भारावलेले तरुण एकत्र येत नवनवीन समाजोपयोगी विधायक कार्यक्रम करत असतात. हे काम पाहून महाराष्ट्रातील शेकडो तरुण या ग्रुपशी जोडले गेले आहेत .
रॉयल बुलेट ग्रुपच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम घेतले जात असतात, यापूर्वीही वृक्षारोपण, चारा वाटप, गरजूंना मदत इत्यादी मदत या ग्रुप कडून केली असून, यापुढे ही सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत . – गोविंद ढेरंगे,उपकार्यध्यक्ष रॉयल बुलेट ग्रूप शिवजयंती उत्सव पुणे जिल्हा / शिरूर तालुका प्रमुख-महाराष्ट्र वाहतूक सेना.