नवनिर्वाचित सरपंच विक्रम गव्हाणे व माजी सरपंच अमोल गव्हाणे, माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे यांच्याकडून दिव्यांग बांधवांचा सत्कार
पुणे – रुचिका क्लब मुंबई व संपर्क संस्था यांच्यावतीने दिव्याग आरोग्य तपासणी व साहित्याचे वाटप यांच्यावतीने दिव्यांग बांधवांना दहा प्रकारचे साहित्याचे श्रवण यंत्र,व्हील चेअर
क्रेचर (कुबड्या),तीन चाकी सायकल,कॅलिपर (शूज व पट्टा) पोलिओग्रस्तांसाठी ,स्प्लिट (Splint) हाताला पकड येण्यासाठी ,सेरेब्रल पालसीग्रस्त व्यक्तींसाठी, कृत्रिम हात, वॉकर पोर्टेबल / फिक्स स्टील , स्टिक:,सिंगल / ट्रायपॉड / tetrapod , अंधांसाठी: काठी / चष्मा याचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिरूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांना रुचिका क्लब मुंबई व संपर्क संस्था यांच्या विद्यमाने व्हीलचेअर, कुबड्या ,स्टिक, हॅंडीकॅप बाइसिकल असे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी आयोजकांकडून दिव्यांग बांधवांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. याबाबत प्रहार क्रांती अपंग संस्थेच्या वतीने प्रहार संघटनेचे शिरूर तालुकाध्यक्ष कुंडलिक वायकुळे यांनी आभार मानले.
यावेळी शिरूर तालुक्यातील वीस ते पंचवीस दिव्यांग बांधवांना या शिबिरातून साहित्य वाटप करण्यात आल्या असून कोरेगाव भीमा येथे सर्व दिव्यांग बांधवांनी याबाबत आनंद व्यक्त करत संस्थेचे आभार मानण्यात आले यावेळी कोरेगाव भीमाचे नवनिर्वाचित सरपंच विक्रम गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे,माजी उपसरपंच दत्तात्रय ढेरंगे यांच्या हस्ते सर्व दिव्यांग बांधवांचा सत्कार करण्यात आला.