कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथील राष्ट्रीय अबॅकस परीक्षेत कुमारी शर्वरी गणेश गव्हाणे विद्यार्थिनीने अवघ्या ४ मिनिटे ४२ सेकंदात १०० गणिते सोडवत देशात दुसरा क्रमांक मिळवत राष्ट्रीय स्तरावर विक्रम नोंदवला आहे.
नांदेड येथे मेट्रोब्रेन एज्युकेअर प्रा. लि. या कपंनीमार्फत घेण्यात आलेल्या ५ व्या राष्ट्रीय अबॅकस परीक्षेत कोरेगाव भीमा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरी मधील विध्यार्थिनी कु. शर्वरी गणेश गव्हाणे या विद्यार्थिनीने अवघ्या ४ मिनिट ४२ सेकंदात १०० गणिते सोडवून तिच्या वयोगटातून ( ८ ते ९ वर्ष वयोगट) २ दोन्ही पेपर मधून देशातून २ दुसरा नंबर मिळवला आहे. त्यामुळे शर्वरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शर्वरीच्या या यशासाठी तिचे वडील गणेश गव्हाणे यांनी खूप मदत केली तर अपसिंगे अबॅकस अकॅडमि चे संचालक शिवानंद अपसिंगे सर यांनी मार्गदर्शन केले.