डिंग्रजवाडी येथील विमल गव्हाणे यांच्या अरोग्य क्षेत्रातील सेवाभावी व उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्काराच्या सन्मानाने शिरूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
कोरेगाव भीमा – दिनांक २ डिसेंबर
पेरणे ( ता.हवेली ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सहाय्यक पदावर कार्यरत असणाऱ्या विमल पोपट गव्हाणे यांनी राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.
आरोग्य खात्यामध्ये आरोग्य परिचारिका म्हणून अविरतपणे सेवा निभावल्याबद्दल कोरोना काळात जिवाची तमा न बाळगता रुग्न सेवेला प्राधान्य दिले. त्यांच्या या विशेष कार्याबद्दल त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याहस्ते सन्मानित करण्यात येणार असुन महाराष्ट्रातून त्याची एकमेव निवड करण्यात आली आहे.
डिंग्रजवाडी येथील मूळ रहिवासी असलेल्या विमल गव्हाणे यांच्या सत्काराने शिरूर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून पुणे जिल्ह्यातून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्काराने गौरविण्यात येणार त्या एकमेव महिला आरोग्य सेविका असल्याचे बोलले जात आहे.
पेरणे (ता.हवेली ) येथील आरोग्य खात्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून काम पाहात आहेत. संपूर्ण ३७ वर्ष सेवाकाळ त्यांनी आरोग्य-परिचारिका म्हणून आरोग्य सेवेत व्यतीत केली आहेत.
या वर्षीचा पुरस्कार सोहळ्याचे वितरण शनिवार दि. ३ डिसेंबर २२ रोजी सकाळी ११:३० वा. सह्याद्री चॅनल वर थेट प्रेक्षपन होणार आहे.