Wednesday, November 20, 2024
Homeताज्या बातम्याराज्य सरकारचे दिव्यांगांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग धर्मेंद्र सातव यांनी एका...

राज्य सरकारचे दिव्यांगांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी दिव्यांग धर्मेंद्र सातव यांनी एका पायावर महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई केले सर

अपंगाला शारीरिक व्यंगामुळे कुणी कमजोर समजू नये अपंग आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करून सरकारी सेवेत चांगल्या पद्धतीने नोकरी करेल त्यामुळे नवीन वर्षात २०२४ मध्ये सरकारने दिव्यांगांसाठी असलेल्या नोकऱी मधील  ४% टक्के आरक्षण मधील सर्व कोटा भरून दिव्यांगांना नोकरी द्यावी तसेच व्यवसायासाठी कर्ज देणे बंद असून ते तत्काळ सुरू करुन दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून द्यावा – धर्मेंद्र सातव, दिव्यांग

पुणे – एका पायाने चालता येत नाही. सोबत एलबो क्रचेस घ्यावी लागते. वजन ९० किलो आणि तरी देखील दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे त्यांनी महाराष्ट्रातील सर्वोच्च कळसूबाई (१६४६ मीटर) शिखर प्रयत्न,चिकाटी व जिद्दीच्या जोरावर सर केले. हे धाडस केवळ दिव्यांगांच्या हक्कासाठी त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी व सरकारचे डोके ठिकाणावर यावे यासाठी प्रहार अपनग क्रांती संघटनेच्या धर्मेंद्र सातव या कर्तृत्ववान दिव्यांग बांधवाने दिव्यांगांचे प्रश्न सुटावेत आणि सरकारचे याकडे लक्ष वेधावे म्हणून हा खटाटोप  केला.

  समाजात अनेक घटक आहेत की त्यांना आपल्या हक्कासाठी अजून ही लढावं लागतं. अपंग म्हंटल की त्यांच्याकडे एका वेगळ्याच नजरेनं पाहिलं जातं. परंतु त्यांच्या शारीरिक व्यंगाकडे लक्ष न देता त्यांच्या कौशल्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

गेली अनेक वर्षांपासून धर्मेंद्र सातव हे दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी लढत आहेत. त्यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील पाठवले आहे. धर्मेंद्र सातव हे एका पायाने ९४% दिव्यांग असून त्यांनी कळसूबाई शिखर चढले आहे. सरकारी नोकरीतील दिव्यांग अनुशेष भरण्यात यावा व दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा देण्यात यावा.राज्य शासनाच्या तसेच स्थानिक स्वराज्य संस्था मधील विविध विभागातील दिव्यांगांसाठी आरक्षित जागा भरल्या जाव्या, अशी मागणी ते करत आहेत. दिव्यंगत्वावर मात करत महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर सर करून एक वेगळा विक्रम केला आहे. यावेळी त्यांनी दिव्यांगांच्या मागणीसाठी पोस्टर परिधान करत घोषणा देत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला

दिव्यांगांना कमजोर समजू नये. – या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धर्मेंद्र सातव यांनी दिव्यांग असूनही महाराष्ट्रातील सर्वोच्च ठिकाण कळसुबाई शिखर अडथळ्यांची शर्यत पार करीत गाठलं. कळसुबाई शिखर एका पायाने चढण्याचा उद्देश अपंगाला शारीरिक व्यंगामुळे कुणी कमजोर समजू नये. अपंग आपल्या शारीरिक व्यंगावर मात करून सरकारी सेवेत चांगल्या पद्धतीने नोकरी करू शकतो, असे सातव सांगतात.

काय मागण्या आहेत?१.सरकारने तत्काळ दिव्यांगांचा नोकरीतील अनुशेष आरक्षण कोटा पूर्ण भरावा.२. कंत्राटी भरती मध्ये ४% दिव्यांगांना नोकरी द्यावी.३. मागील पाच सहा वर्षापासून अपंग वित्त महामंडळ महाराष्ट्र राज्य यांनी एकाही दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज दिले गेले नाही. त्यामुळे लाखो दिव्यांग उदरनिर्वाहासाठी स्वतःचा व्यवसाय करू शकत नाहीत. त्यामुळे अपंगांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे.

हे पण वाचा –शिरूरच्या बी डी ओ कार्यालयाचा रिकाम्या खुर्च्या कारभार पाहतायत काय ?

म्हणून सर केलं कळसुबाई शिखर – नवीन वर्षात २०२४ मध्ये सरकारने दिव्यांगांसाठी असलेल्या नोकऱी मधील ४% टक्के आरक्षण मधील सर्व कोटा भरून दिव्यांगांना नोकरी द्यावी. तसेच व्यवसायसाठी कर्ज देणे तत्काळ सुरू करुन दिव्यांगांना व्यवसायासाठी कर्ज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ते करतात. तसेच कळसुबाई शिखर चढत असताना अनेक अडचणी आल्या त्रास झाला तरी देखील हे शिखर सर केले. कारण दिव्यांगांच्या मागण्या सरकार पर्यंत पोहचवायच्या होत्या, अशी माहिती दिव्यांग धर्मेंद्र सातव यांनी दिली आहे. 

सातव यांच्या सोबत प्रिया लोखंडे, बापू कोकरे, सिध्दराम माळी, दादा ठोंबरे, दादा काळूखे यांनी देखील सहभाग घेतला.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!