पाच वर्षानंतर पुन्हा एकदा लावणी महोत्सव सुरू,पुढील वर्षीही होणार लावणी स्पर्धा
अकलूज येथे प्रभादेवी मोहिते पाटील यांचे जन्मशताब्दी वर्ष व जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा व मदनसिंह मोहिते पाटील यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त स्वरूपाराणी मोहिते पाटील यांचे नियोजना खाली अकलूज येथील स्मृती भवन येथे आयोजित केलेल्या २७ व्या राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला असून सणसवाडी येथील जय अंबिका कला केंद्राच्या वैशाली समसापुरकर पार्टी, ज्योस्तना, रुक्मिणी,अर्चना वाईकर पिंजरा कला केंद्र वेळे , न्यू अंबिका कला केंद्र ग्रुप पार्टी यवत चौफुला या तीन पार्ट्यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकाविला.विजेत्या पार्टींना माजी मंत्री दिलीपराव सोपल यांच्या हस्ते तर जयसिंह मोहिते पाटील उर्फ बाळदादा व स्पर्धाध्यक्ष स्वरूपाराणी मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत बक्षिस व स्मृतिचिन्हाचे वितरण करण्यात आले.
स्पर्धेत द्वितीय क्रमांक ओम भगवती सांस्कृतिक कला केंद्र नांदगाव , तृतीय क्रमांक मंगल माया प्रीती खामगावकर नटरंग कला केंद्र मोडनिंब, चतुर्थ क्रमांक विद्या पूजा किरण काळे रुईकर पार्टी भोकर फाटा नांदेड आणि पाचवा क्रमांक विभागून छाया पूजा श्रद्धा कोल्हापूरकर रेणुका कला केंद्र ,आंबुप कला केंद्र कोल्हापूरकर व अनिता परभणीकर नटरंग कला केंद्र मोडनिंब यांनी पटकावला या
अनुक्रमे प्रथम क्रमांक पाच लाख रुपये द्वितीय क्रमांक तीन लाख रुपये तृतीय क्रमांक एक लाख रुपये, चतुर्थ क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये,पाचवा क्रमांक एकावन्न हजार रुपये व ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले तर उत्कृष्ट ढोलकी पट्टू नितीन जावळे उत्कृष्ट पार्श्वगायिका प्राजक्ता महामुनी उत्कृष्ट पेटी वाजत विकी जावळे आणि उत्कृष्ट तबलावादक राहुल जावळे यांना देखील सन्मानित करण्यात आले यावेळी रंगमंचावर सहकार महर्षी लावणी कलावंत पुरस्कार विजेत्या राजश्री नगरकर सरला नांदुरीकर मीना परभणीकर रेश्मा पर्वतीकर उपस्थित होते.
स्पर्धेचे वैशिष्ट्य – अकलूज येथील राज्यस्तरीय लावणी स्पर्धेच्या आयोजक स्वरुपाराणी मोहिते पाटील यांनी सहा वर्षांपासून बंद पडलेला हा कार्यक्रम यावर्षीपासून पुन्हा सुरु केला आणि पहिल्या दिवशी खास महिलांसाठी सलग दोन कार्यक्रम घेतले.
या लावणी नृत्य स्पर्धेत पहिल्या दिवशी महिला कलावंतांना महिला रसिकांची उस्फुर्त दाद मिळाली. महिला कलाकारांनी महिला रसिकांसाठी सादर केलेली लावणी उत्सुकतेचा व कलेच्या अत्युच्च आनंदाचा क्षण अकलूजकर माता भगिनींनी अनुभवला. यावेळी अनेक कलाकारांचे या महोत्सवात आपली कला सादर करण्याची इच्छा पूर्ण झाल्याने भावूक झाल्याने डोळे पाणावले होते.
अकलूजच्या लावणी स्पर्धेने गेल्या ३०वर्षात शेकडोंच्या संख्येने आघाडीचे लावणी कलावंत दिले. अगदी अलीकडची लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील हिनेही आपल्या कारकिर्दीची सुरुवात याच अकलूज लावणी स्पर्धेपासून केली होती.
जंगी कार्यक्रमाची आखणी – या स्पर्धेमुळे अनेकांना चित्रपटसृष्टीत अभिनेत्री बनण्याची संधी मिळाली तर अनेक कलावंतांचे शो अगदी अमेरिकेपर्यंत होऊ लागले होते. मात्र गेल्या सहा वर्षांपासून ही स्पर्धा बंद झाली आणि लावणी कलावंत बनविण्याची फॅक्टरी बंद पडली होती. यामुळे गेल्या सहा वर्षात नवीन कलावंतांना राज्यस्तरीय प्रसिद्धी मिळू शकली नाही. सुरु झालेल्या या लावणी स्पर्धेत अनेक नवोदित लावणी कलावंत विविध पार्ट्यामधून आपली कला सादर करत आपल्या अदाकारी, पदन्यास ,गायकी, वादन व सामूहिक प्रदर्शन करत आपल्या कलागुणांना प्रदर्शित करत महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेली लावणी सादर केली.
शुक्रवारपासून तीन दिवस या राज्यस्तरीय लावणी स्पर्धा पार पडल्या तीनही दिवसांची सर्व तिकिटे राज्यभरातील लावणी रसिकांनी उपस्थिती लावत कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद व शाबासकी व दाद दिली.राज्यातील सर्व आघाड्याच्या कलाकारांच्या पार्ट्या यात सहभागी झाल्या आहेत .