कुलदीप मोहिते कराड
कराड : दि. १८ जून
राजस्थान येथील जगदीशप्रसाद झबरमल तिब्रेवाला विद्यापीठ च्युडेला झुनझुन येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ क्रिकेट पुरुष स्पर्धेसाठी वेणूताई चव्हाण कॉलेज, कराडमधील बी. कॉम. भाग 3 चा खेळाडू विद्यार्थी सिद्धार्थ अविनाश जगदाळे यांची शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर संघात अभिनंदनीय निवड झाली. या निवडीबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्था, विद्यानगर कराडच्या उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराडचे जनरल सेक्रेटरी प्रकाश पांडुरंग पाटील यांच्या शुभहस्ते सिद्धार्थ अविनाश जगदाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. महाविद्यालयास खेळाडूंची उज्ज्वल परंपरा लाभली असून सिद्धार्थ जगदाळे यांनी यापूर्वी अनेक स्पर्धेत सहभाग घेऊन पारितोषिके प्राप्त केली आहेत. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव, क्रीडा संचालक प्रा. व्ही. एस. डाफळे, प्रा. दिग्विजय पाटील, माजी प्रा. बी. बी. कश्यप यांनी अभिनंदन केले.