शिक्रापूर (ता. शिरुर) येथे राजमाता जिजाऊ यांच्या पालखी सोहळ्याचे मोठ्या जल्लोषाच्या वातावरणात उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी सदर पालखी सोहळ्याचे स्वरूप पुढील काळात नक्कीच व्यापक होईल असा आशावाद सरपंच रमेश गडदे यांनी व्यक्त केला आहे.
शिक्रापूर ( ता. शिरुर) येथे राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथून आलेल्या राजमाता जिजाऊ पालखीचे आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले, यावेळी सरपंच रमेश गडदे, उपसरपंच सारिका सासवडे, ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन कळमकर, मोहिनी मांढरे, मंगल सासवडे, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र मांढरे यांसह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
या पालखीचे शिक्रापुरात स्वागत प्रसंगी बोलताना लखोजी राजे जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव यांनी शिक्रापूर येथे झालेला सन्मान सोहळा निश्चित स्वरूपात कौतुकास्पद आहे.जिजाऊंचा जीवन गौरव उलगडणारा आहे. येणाऱ्या काळामध्ये या पालखी सोहळ्याचे स्वरूप आणखी व्यापक स्वरूपात झालेले असेल अशा भावना व्यक्त केल्या.
यावेळी ग्रामपंचायत शिक्रापूरचे आदर्श सरपंच रमेश गडदे यांनी पुढील काळामध्ये या पालखीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तर भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ मांढरे यांनी जिजाऊंच्या या पालखी सोहळ्याचे कौतुक करून शिवछत्रपतींच्या काळातील विविध सरदार घराण्याचा गौरव केला. या पालखी सोहळ्यासाठी सर्वच शिवभक्तांनी संयोजक म्हणून काम पाहिले ज्यामध्ये शिवश्री शरद पाटील दरेकर, उद्योजक विशाल पाबळे, उद्योजिका नंदा भुजबळ, सामाजिक कार्यकर्त्या अलका जोगदंड, रोहीनी दरेकर,
किरण ढमढेरे, वैभव ढमढेरे, शिवाजी घोडे, राहुल पाबळे, निलेश गुंड, अनिकेत पाबळे, सचिन शिंदे, माऊली पाबळे, सुमंत शेळके या सर्वांनी उत्तम नियोजन केले तर याप्रसंगी झालेल्या सन्मान सोहळ्याबद्दल सर्वांनीच आनंद व्यक्त केला व जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा या ठिकाणी जागर करण्याचा मनोदय व्यक्त केला.