Saturday, September 7, 2024
Homeक्राइम मोक्यातील सहा महिन्यांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट ६ ने ठोकल्या बेड्या.. 

 मोक्यातील सहा महिन्यांपासून फरार आरोपीला गुन्हे शाखा युनिट ६ ने ठोकल्या बेड्या.. 

पोलीस अंमलदार समीर पिलाने यांनी अचूक माहिती मिळवत आरोपीच्या आवळल्या मुसक्या

लोणी काळभोर (ता. हवेली) विविध गुन्ह्यांतर्गत मोक्यातिल सहा महिन्यांपासून फरार आरोपी  ऋषिकेश किसन खोड याला गुन्हे शाखा युनिट ६ यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदार युनिट  फरार आरोपींचा शोध व गुन्हेगार चेकिंग गस्त करीत असताना पोलीस अंमलदार समीर पिलाने यांनी अचूक माहिती मिळवत सदर आरोपीच्या मुसक्या अवळल्या असून सहा महिन्यांपासून फरार आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

  लोणीकाळभोर पोलीस स्टेशन  येथे विविध गुन्ह्यांतर्गत मोक्यातील फरार आरोपी ऋषीकेश किसन खोड (वय २४) रा पांडवनगर, वडकी, ता. हवेली,  पुणे हा सोनाई हॉटेलसमोर, सासवड रोड येथे येणार असल्याची पोलीस अंमलदार समीर पिलाने यांना खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर बातमीच्या अनुशंगाने स्टाफसह जावून खात्री केली असता तो पोलिसांना पाहून पळून जात असता पाठलाग करून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी लोणीकाळभोर पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे. 

           अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे,पोलीस उप आयुक्त गुन्हे अमोल झेंडे,सहा.पोलीस आयुक्त सो गुन्हे २सतीश गोवेकर  या वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम ,पो हवा विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, पो ना कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, पो. अंमलदार समीर पिलाणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, ऋषीकेश ताकवणे, नितीन धाडगे, शेखर काटे, प्रतीक्षा पानसरे यांचे पथकाने केलेली आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!