Saturday, September 7, 2024
Homeताज्या बातम्यामहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाकडून उंब्रज येथील नियोजित शिवस्मारकास भेट देत...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाकडून उंब्रज येथील नियोजित शिवस्मारकास भेट देत केली पाहणी

कुलदीप मोहिते कराड

उंब्रज – उंब्रज (ता. कराड) मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व नामदार शंभूराजे देसाई यांच्या शुभहस्ते होणाऱ्या उंब्रज येथील नियोजित शिव स्मारकाचे भूमिपूजन संदर्भात दिनांक २१ ऑगस्ट रोजी शिवसेनेचे सातारा जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे यांनी नियोजित उंब्रज मधील शिवस्मारक स्थळास भेट देऊन पाहणी केली . यावेळी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी ठाण्याचे विभाग प्रमुख गोविंद उबाळे, शिवयोद्धा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष बेडके,शिवसेना उपजिल्हाप्रमुख समीर जाधव, दक्षिण उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते उपाध्यक्ष शरद जाधव, खजिनदार रणजीत कदम ,अभिजीत जाधव, कॅप्टन इंद्रजीत जाधव, महेश जाधव, तुषार पाटील आदि उपस्थित होते

बाजारपेठेमध्ये मध्यवर्ती ठिकाणी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा १६ फुटी उंच भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्याची उंब्रज पंचक्रोशीतील नागरिकांची व शिवप्रेमींची इच्छा असल्याने हे शिवकार्य संकल्प पूर्तता करण्याची जबाबदारी श्री शिवयोद्धा प्रतिष्ठान उंब्रज यांनी घेतली आहे. यासाठी समाजातील सर्व समाज घटक सढळ हाताने मदत करत आहेत .लोकवर्गणीतून पुतळा उभारणीचे काम उंब्रज मध्ये श्री शिवयोद्धा प्रतिष्ठानच्या मार्फत चालू असून उंब्रज पंचक्रोशीतील नागरिक यासाठी मोठी मदत करत आहेत.

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारल्याने उंब्रज नगरीच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक वैभवात अनमोल अशी भर पडणार आहे . उंब्रज नगरीच्या एकतेचे ,एकजुटीचे व रयतेच्या सहभागातून उभे राहिलेले आगळे वेगळे शिवस्मारक उभे राहणार असून यामुळे तमाम मराठी जनमानास प्रेरणा व बळ मिळणार आहे.

संबंधित लेख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ताज्या बातम्या

Recent Comments

error: Content is protected !!