कोरेगाव भीमा – दिनांक २४ जुलै
वढू बुद्रुक ( ता.शिरूर) येथील माहेर संस्थेमध्ये एक अनोखा विवाह सोहळा नुकताच पार पडला व माहेर संस्थेला १८८ वा जावई मिळाला.
माहेर संस्था गेल्या २५ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात दर्जेदार व उल्लेखनीय काम करत आहे. या संस्थेच्या माध्यमातून पथदर्शी व सामाजिक उत्तरदायित्व जपणारे कार्यक्रम राबवले जात आहेत. ज्याला कोणी नाही त्याला हक्काचे असे घर म्हणजे माहेर मध्ये आश्रयीत असलेली नेहा या मुलींचा विवाह नुकताच मोठ्या आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला.
नेहाला कोणाचाही आधार नव्हता तेंव्हा ल्युसी क्युटियान यांनी माहेरचा आधार दिला. ल्युसी क्युरियान यांच्या छत्रछायेखाली असलेल्या नेहाला त्यांनी उत्तम शिक्षण ,संस्कार व मायेची ऊब देत मोठे केले. तिला स्वतःच्या पायवाट उभे राहण्यास सक्षम बनवले.अशा या ल्युसी क्युरीयान यांच्या माहेर संस्थेच्या लेकीचा विवाह सोहळा नुकताच आनंदाच्या वातावरणात पार पडला.
वढु बुद्रुक येथील माहेर संस्थेच्या प्रांगणात सांगली येथील श्रीकांत आत्माराम शेंडे यांचे चिरंजीव चि.सुबोध यांच्याशी नेहा यांचा विवाह संपन्न झाला आणि माहेर संस्थेला १८८ वा जावई मिळाला.
सदर विवाह सोहळयासाठी अनेक दात्यांनी मदत केली व वधू वरांस आशिर्वाद दिले. सदर विवाह सोहळयासाठी संस्थेच्या संस्थापिका सिस्टर लुसी कुरियन, माहेरचे विश्वस्त योगेश भोर, सहसंचालक रमेश दुतोंडे, मिनी एम.जे. माया शेळके, तुषार जोशी, रमेश चौधरी, अनिता दुतोंडे,निता सुर्यवंशी, वसंतराव यादव, विष्णू सुर्यवंशी, अमोल त्रिभुवन, विक्रम भुजबळ तसेच महिला व संस्थेतील बालगोपाळ उपस्थित होते.