कोरेगाव भीमा – पेरणे फाटा ( ता.हवेली) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र पेरणे फाटा व माहेर संस्थेच्या वतीने झोपडपट्टीमध्ये 130 लोकांचे कोरोना लसीकरण करण्यात आले . यावेळी महिला भगिनींनी मोठा सहभाग घेतला. यावेळी नागरिकांना पहिला व दुसरा व बूस्टर डोस देण्यात आला .
पेरणे ग्रामीण रुग्णालय व माहेर संस्थेच्या माध्यमातून लसीकरणाचा हा दुसरा कॅम्प आहे यासाठी अनिता गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते अतुल शेळके यांनी सर्व वस्तीवरील लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना लसीकरणाची माहिती देऊन दुसरा डोस घ्यावयास सांगत १३० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले
यावेळी माहेर संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते अतुल शेळके, अनिता गायकवाड ,गायत्री निर्मळ ग्रामीण रुग्णालय पेरणे येथील सिस्टर आशा गायकवाड सिस्टर ,नीता वसुली सिस्टर, आशा चव्हाण , संतोष वाळके ,आशा वर्कर लता मल्लाव व उषा वाळके उपस्थित होते.