स्थानिक महिलांच्या अंदाजानुसार महिला लहान मुलगा व मुली सोबत पाहीली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन कर्मचारी तपास करत आहे.
कोरेगाव भीमा – कोरेगाव भीमा (ता.शिरूर) येथे माता तू न वैरिणी … असा अनुभव आला असून जन्मदात्या आईनेच सहा महिन्यांच्या मुलीचे अर्भक पुणे नगर हायवेच्या बाजूला शंभर मीटरच्या आतमध्ये रस्त्याच्या बाजूलाच लाकडाच्या बॉक्समध्ये अर्भकाला टाकून देण्यात आल्याने कोरेगाव भिमा पंच क्रोशिमध्ये खळबळ उडाली आहे.Mata na tu Vairini…. In Koregaon Bhima, the mother herself dumped the six-month-old infant girl
याबाबत फरची ओढा येथील गव्हाणे पाटील नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या जय मल्हार फॅब्रिकेशन समोर मुलीचे अर्भक टाकून देण्यात आले येथे अजय गव्हाणे व किरण गव्हाणे यांना ते अर्भक दिसले याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर व माहेर संस्थेच्या संस्थापिका ल्युसी कुरियन यांना कळवले असता त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, महिला पोलीस नाईक अपेक्षा तावरे, पोलीस अंमलदार प्रताप कांबळे, यांच्यासह १०८ अँब्युलन्स कर्मचारी व डॉक्टर पोळ तातडीने येत सहा महिन्यांच्या मुलीला ताब्यात घेण्यात येऊन पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शिक्रापूर येथे मुलीला पोलिसांच्या निगरानित पाठवण्यात आले.Mata na tu Vairini.... In Koregaon Bhima, the mother herself dumped the six-month-old infant girl
आईनेच मुलीला टाकल्याचा संशय –
ग्रामस्थांनी व तेथील महिलांनी दिलेल्या माहितीनुसार तोंडाला बांधलेली काळया रंगाच्या साडीतील अंदाजे तीस वर्षांच्या महिलेसोबत एक मुलगा व ही मुलगी पहिल्याच सांगता महिलेकडे तीन ते चार बॅगा होत्या त्याच महिलेने लहान अर्भक मुलीला सोडल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे
याबाबत शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे किरण गव्हाणे हे फिर्याद देत असून संबधित आरोपीचा शोध तातडीने घेण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.यावेळी कोरेगाव भिमा ग्राम पंचायतीच्या सदस्या मनीषा गव्हाणे, प्रवीण गव्हाणे, माजी चेअरमन देविदास गव्हाणे, गोकुळे गुरुजी, महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .