पुणे – पुणे महानगर प्रदेश विकास प्रधीकरणाच्या वतीने मांजरी खुर्द व कोलवडी ता हवेली येथील २३३.३५ हेक्टर क्षेत्रावरील प्रस्तावित प्राथमिक योजना मजुरीसाठी शासनाकडे सादर केली आहे. पीएमआरडीए क्षेत्राच्या नियोजनबद्ध विकासाठी नगर रचना योजनाचे नियोजन केले असून पीएमआरडीए च्या अंतर्गत वर्तुळाकार मार्गाचे (रिंग रोड) क्षेत्र संपादनासाठी प्रस्तावित केलेल्या अनेक योजना पैकी मांजरी खुर्द- कोलवडी नगर रचना योजनेतील सर्व जमीन मालक यांना वैयक्तिक सुनावणी दिल्या नंतर या योजनेसाठी शासननियुक्त लवाद शिवराज पाटील सेवा निवृत्त उप संचालक नगर रचना यांनी लवाद विषयक कामकाज पूर्ण करून ही योजना मंजुरीसाठी शासनाकडे नुकतीच सादर केली आहे.
सुमारे १५०० खातेदार शेतकरी यांची २३३.३५ हे आर क्षेत्र या नगर रचना योजनेत समावेश असून त्यामध्ये ५०% क्षेत्राचे म्हणजेच १११.६७ हे.आर चे १५३ विकसित अंतिम भूखंड लाभधारक शेतकरी यांना उपलब्ध करून देनेत आले असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (EWS) गृह योजनासाठी २२.३३ हेक्टर क्षेत्राचे १० भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. या योजना क्षेत्रात सुमारे ७.४५ हे आर क्षेत्र रिंगरोडसाठी व २६.०१ हे आर क्षेत्र अंतर्गत रस्ते या साठी तसेच मैदानांसाठी ७.४५ हे.क्षेत्र चे ६ भूखंड, बगीचा साठी २ भूखंड क्षेत्र १.०० हे , बालोद्यानासाठी ४ भूखंड क्षेत्र १.४१ हे.,रिव्हर फ्रंट / ग्रीन बेल्ट साठी १४.५४ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आल्या आहेत, या शिवाय नागरी सुविधांमध्ये २ प्राथमिक शाळा, २ प्राथमिक आरोग्य केंद्र, घन कचरा संकलन केंद्र ,रुग्णालय, सांस्कृतिक केंद्र,४ भाजीपाला केंद्र, अग्निशामक केंद्र, स्मशानभूमी, दोन सब स्टेशन, सांडपाणी प्रक्रीया केंद्र, बस स्थानक, ४ शॉपिंग सेंटर, या साठी देखील एकूण १४.११ हे क्षेत्राचे २४ भूखंड आरक्षित करण्यात आले आहेत. या नगर रचना योजनेतून ६५ मी रुंदीच्या १.६ कि मी रस्तासाठी लागणारे सुमारे ७.४५ हे.आर क्षेत्र ताब्यात येईल. तसेच या योजनेतून प्राधीकरणास १७.३५ हे क्षेत्राचे १२ भूखंड उपलब्ध होणार आहेत. सदरची योजनेचे लवादीय कामकाज पूर्ण झाल्याची घोषणा लवाद यांनी दि १२ ते १८ जाने २०२३ च्या शासन राजपत्रात प्रसिद्ध केली आहे.