प्रतिनिधी सुनील थोरात
हवेली – दिनांक १० फेब्रुवारी
हवेलीतील उरुळी कांचन येथील उप कार्यकारी अभियंता लाच घेताना रंगेहात एसीबीच्या जाळ्यात अडकला असून ओपण प्लॉटमध्ये विद्युत रोहीत्राचा पुरवठ्याची परवानगी देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच स्विकारताना उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता. १० ) रंगेहात पकडले आहे.
प्रदीप वासुदेव सुरवसे (वय – ४८, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे लाच स्वीकारणाऱ्या उपअभियंत्याचे नाव आहे.
याप्रकरणी ३९ वर्षीय खाजगी विद्युत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे एक खाजगी विद्युत ठेकेदार आहे. ठेकेदाराकडील ग्राहकांच्या मोकळ्या जागेमध्ये नवीन रोहीत्र बसविण्यासाठी तसेच त्याचे अंदाजपत्रक पास करून पुढील कार्यालयाची मान्यता मिळवण्यासाठी २५ हजार रुपयांची सुरवसे यांनी मागणी केली होती. या दरम्यान, तडजोडी अंती सुरवसे यांना २० हजार देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांनी याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी (ता १०) २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक सुहास नाडगौडा, यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.