राष्ट्रवादीने प्रभागांची चिरफाड केली
मांजरी बुद्रुक येथील पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी वर हल्ला…
हवेली प्रतिनिधी सुनील थोरात
मांजरी बुद्रुक – ८ फेब्रुवारी
मांजरी बुद्रुक प्रभाग क्रमांक 22 मधील अमित घुले यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या प्रांगणात आढावा बैठकीत बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभागांची विचित्र चिरफाड केली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत महापालिकेने केलेली कामे व पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने देशभरात राबविलेले तेच उपक्रम हे नागरिकांमध्ये खोलवर रुजलेले आहेत. त्यामुळे प्रभागांची कितीही तोडफोड केली असली तरी मतदार आमच्याच पाठीशी राहील आणि महापौर भाजपचाच होईल असे प्रतिपादन केले .
चंद्रकांत पाटील म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेसला महापालिकेतील भाजपची सत्ता पेलवली नाही. त्यामुळे त्यांनी नवीन गावे आपल्या मालकीची असल्यासारखी महापालिकेत सामाविष्ट केली. त्यानंतर प्रभागांची हवीतशी तोडफोड केली. सत्ता मिळविण्यासाठी त्यांनी असा प्रयत्न सुरू केला आहे. पन्नास वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, तर पाच वर्षे भाजपची सत्ता राहिली त्यात काय केले ते नागरिकांनी पाहिले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने कितीही जोर धरला तरी महापालिकेत ९० पेक्षा अधिक नगरसेवक हे भाजपचे आमचेच राहतील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्ष यांच्या सारखे मी हवेत बोलणार नाही. तर मतदार यांचा कौल व विश्वास असल्याचे दिसून येते आहे.
मांजरी बुद्रुक येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्या बरोबर ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार योगेश टिळेकर, बापूसाहेब पठारे, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष जालिंदर कामठे, शहर संघटक सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश सदस्य रोहिदास उद्रे, हडपसर विधानसभा अध्यक्ष संदीप दळवी, जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, सरचिटणीस संदीप लोणकर, उपाध्यक्ष भूषण तुपे, मांजरी बुद्रुक सदस्य अमित आबा घुले, अविनाश मगर, सुनील धुमाळ, माजी सरपंच शिवराज घुले, आण्णा धारवाडकर, माजी जिल्हा परिषद सदस्या वंदना कोद्रे, डॉ. दादा कोद्रे, माजी उपसरपंच सुमीत घुले, मांजरी बुद्रुक ग्रा. उपसरपंच अमित घुले, बाळासाहेब घुले, गणेश घुले, विशाल म्हस्के, आदी उपस्थित होते.